आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर मार्केट अपडेट्स:सेन्सेक्स 712 अंकांनी वधारला, निफ्टीने 17100 ची पातळी ओलांडली; मेटल शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार वाढ

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 712.46 अंकांनी किंवा 1.25 टक्क्यांनी वाढून 57,570.25 वर बंद झाला. निफ्टी 228.70 अंकांनी किंवा 1.35 टक्क्यांनी वाढून 17,158.30 वर बंद झाला.

एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा स्टील, सन फार्मा एचडीएफसी लाइफ आणि हिंदोल्को हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढलेले आहेत. तर डॉ रेड्डीज लॅब्स, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, डिव्हिस लॅब्स आणि अ‌ॅक्सिस बॅंकेचे शेअर्स सर्वाधिक नुकसान देणारे ठरले आहेत. मेटल निर्देशांक 4 टक्के पेक्षा जास्त वाढले. तर फार्मा, ऑटो, आयटी क्षेत्रातील निर्देशांक 1-2 टक्क्यांनी वाढले आहेत. तथापी, PSU बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला आहे. ​​​​​​बीएसई मिडकॅप निर्देशांक 1 टक्के आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1.38 टक्के वाढले आहेत.

निफ्टी टॉप 5 लाभार्थी कंपन्या

शेअरसध्याची किंमतवाढ
SBI लाइफ1,2948.61%
टाटा स्टील107.807.42%
हिडाल्को4166.01%
सन फार्मा943.605.45%
कोल इंडिया2124.51%

या पाच कंपन्यांमध्ये निफ्टी घसरले ​​​​​

शेअरसद्याची किंमतघसरण
डॉ रेड्डी4,091.03.97%
SBIN527.650.90%
कोटक बैंक1,814.000.79%
डिवी लैब्स3,8270.59%
एक्सिस बैंक724.500.19%

युएसच्या बाजारात तेजी

गुरूवारी अमेरिकेच्या बाजारांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. युएस फेडने दर वाढीची आक्रमक मोहीम संपवण्याचे संकेत दिलेले आहेत. गुरूवारी, डाऊ जोन्स 332 अंक किंवा 1 टक्क्याने वाढला आणि 32,529.63 वर बंद झाला. S & P 500 निर्देशांक 1.2 टक्के वाढून 4,072.43 वर बंद झाला. तर Nasdaq 1.1 टक्के वाढून 12,162.59 वर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...