आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्ट:सप्टेंबरमध्ये आधार-पॅन लिंक आणि डीमॅट खात्याच्या KYC सह करावे लागतील 'हे' चार कामे, नाहीतर करावा लागू शकतो अनेक अडचणींचा सामना

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँक खात्यात योग्य मोबाईल नंबर अपडेट करणे

सप्टेंबर महिन्यात तुम्हाला काही महत्वाची कामे करावी लागणार आहे. ज्यामध्ये आधार-पॅन लिंक, डीमॅट केवायसीसह चार गोष्टी कराव्या लागू शकतात. तुम्ही जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अनेक सामस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, सप्टेंबर महिन्यात कोणते काम करायचे आहेत?

आधार-पॅन लिंक
30 सप्टेंबरपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले असून तसे न केल्यास तुमचे पॅन निष्क्रिय होईल. नियमानुसार, जर तुमचे पॅन निष्क्रिय झाले असेल आणि तुम्ही ते बँक व्यवहारांसाठी किंवा इतरत्र वापरत असाल, तर तुम्ही ते पॅन कायद्यानुसार दिले नाही असे मानले जाईल. अशा परिस्थितीत तुमच्यावर इनकम टॅक्स कलम 272B अंतर्गत 10 हजारांपर्यत दंड आकारले जाऊ शकते. विशेष म्हणजे आता तुम्ही जर बँक खात्यातून 50 हजारांपेक्षा जास्त पैसे काढत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागणार आहे.

डीमॅट खात्याचे KYC
बाजार नियामक सेबीने (SEBI) नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट खाती उघडण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नियमांनुसार, जर तुमचे डीमॅट खाते असेल, तर तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावे लागणार आहे. जर तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी केले नाहीतर तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उदा. तुम्ही जर एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केले असेल, तर तुम्हाला ते शेअर्स खात्यात ट्रान्फसर करता येणार नाही. तुम्ही जोपर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील प्रक्रिया घडणार आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे
2020-21 या वर्षाचा आयकर परतावा (ITR) 30 सप्टेंबर पर्यंत भरावा लागेल. जर तुम्ही 30 सप्टेंबरनंतर विवरणपत्र भरले नाही तर तुम्हाला 5 हजारांपर्यंत विलंब शुल्क भरावे लागू शकते. ज्या करदात्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा करदात्यांकडून 1 हजार रुपये विलंब शुल्क आकारले जाईल.

बँक खात्याला योग्य मोबाईल नंबर अपडेट करणे
1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम लागू होणार आहे. ऑटो डेबिटचा अर्थ असा की, तुम्ही जर तुमच्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये काही गोष्टी जर ऑटो डेबिट मोडमध्ये ठेवल्या असेल, तर त्या तारिखेला तुमच्या खातयातून ते पैसे आपोआप कापले जातील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...