आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 54,835 पातळीवर बंद, IT क्षेत्रातील शेअरमध्ये सर्वाधिक घसरण; जागतिक बाजाराचा परिणाम

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्यातील व्यवहाराच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 866 किंवा 1.56% अंकांनी घसरून 54,835 वर बंद झाला, तर निफ्टी 271 किंवा 1.63% ने घसरणीसह 16,411 या पातळीवर वर बंद झाला. आयटी, मेटल, रियल्टी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

गुरुवारी यूएस मार्केटमध्ये 2020 नंतरची सर्वात मोठी इंट्राडे घसरण दिसून आली. डाऊ जोन्स 1000 हून अधिक पॉइंटच्या नुकसानासह बंद झाला, Nasdaq जवळपास 650 अंकांनी घसरला आणि S&P 500 ने 150 पेक्षा जास्त अंकानी घसरले. फेड बँकेने व्याजदर वाढवल्यामुळे अमेरिकन बाजारातही घसरण दिसून आली. आज सेन्सेक्स 773.94 अंकांच्या (1.39%) घसरणीसह 54,928 वर उघडला, तर निफ्टी 277 (1.66%) अंकांनी घसरून 16,405 वर उघडला.

जागतिक बाजार स्थिती

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज 1,063.09 अंक किंवा 3.12% घसरून 32,997.97 वर बंद झाला. S&P 500 ने 153.3 अंक, किंवा 3.56% घसरला, तो 4,146.87 वर बंद झाला. Nasdaq Composite 647.17 अंकांनी किंवा 4.99% घसरून 12,317.69 वर आला. हाँगकाँगचा निर्देशांक हॅनसेंग 3% पेक्षा जास्त खाली. चीनचा शांघाय निर्देशांक देखील 2% पेक्षा जास्त घसरला आहे. तर जपानचा निर्देशांक निक्केई 0.5% पेक्षा जास्त वाढला आहे.

मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही घसरण

मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 450 हून अधिक अंकांनी घसरले. अदानी पॉवर, अ‍ॅबॉट इंडिया, श्रीराम फायनान्स, टाटा कम्युनिकेशन्स, एबीबी आणि एनएचपीसी मिड कॅपमध्ये वाढ नोंदवण्यात आली. स्टील अथॉरिटी इंडिया, क्रिसिल, बायोकॉन, व्होल्टास, नौकरी, फेडरल बँक आणि एस्ट्रल यांचे भाव घसरले. स्मॉल कॅपमध्ये एशियन टाईल्स, सीएसबी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर आणि एचआयएल मध्ये तेजी दिसून आली.

निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले

निफ्टीत समावेश असलेल्या सर्व 11 क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली. यामध्ये सर्वात जास्त 3.56% ची घसरण रियल्टी निर्देशांकात झाली. दुसरीकडे, आयटी, वित्तीय सेवा, खासगी बँका आणि धातू क्षेत्रांमध्ये 2% पेक्षा जास्त घसरण झाली. बँक, ऑटो, मीडिया आणि फार्मा 1% पेक्षा जास्त खाली आहेत. दुसरीकडे, FMCG, PSU बँक यांच्यात किरकोळ घसरली दिसून आली.

घसरणीची कारणे आणि तज्ज्ञांचे मत

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक तज्ज्ञ व्ही.के.विजयकुमार म्हणाले की, “जागतिक बाजारातील घसरणीचे कारण म्हणजे वाढत्या महागाईची चिंता. Nasdaq एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहे आणि S&P 500 देखील त्या दिशेने जात आहे. भारतातही एफपीआयची सातत्याने विक्री होत आहे. या अत्यंत अस्थिर काळात गुंतवणूकदारांनी आक्रमक भूमिका न घेता शांत राहावे. गुंतवणूकदारांनी हळूहळू हाय क्वालिटीचे स्टॉक खरेदी करायला हवे.

बातम्या आणखी आहेत...