आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलचे दर:पुढील वर्षी क्रूड तेलाची शंभरी पार, पेट्रोल, डिझेल 10 रुपये महाग होणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर सुमारे ८५ डॉलर प्रतिपिंप (बॅरल) आहेत. ते पुढील तीन ते सहा महिन्यांत १०० डॉलर प्रतिपिंपापर्यंत जाऊ शकतात. ते १०० डॉलरपर्यंत पोहोचल्यावर घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेल सध्याच्या दरापेक्षा ८ ते १० रुपये प्रतिलिटर महाग होईल. राजस्थान आणि मध्य प्रदेशासारख्या जास्त व्हॅट असलेल्या राज्यांत किमती आणखी वाढतील. वास्तविक कच्चे तेल १ डॉलर प्रतिबॅरल महाग झाल्यास देशात पेट्रोलचे दर सरासरी ५५ ते ६० पैसे प्रतिलिटरने वाढतात.

इराकचे पेट्रोलियममंत्री एहसान अब्दुल जब्बारी यांच्या मते, पुढील वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीदरम्यान कच्चे तेल १०० डॉलर प्रतिबॅरलच्या स्तराला स्पर्श करेल. ब्रेंटचे सध्याचे दर (८५ डॉलर) वर्षभरापर्वूीच्या दराच्या तुलनेत (४२.५ डॉलर) दुप्पट झाले आहेत. यामुळे भारतात अडचणी वाढल्या आहेत. भारत आपल्या गरजेनुसार ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. ही आयात वाढवावी लागू शकते.

बातम्या आणखी आहेत...