आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता युकेत भारतीयांना करता येईल UPI पेमेंट:NIPL चा PayExpert सोबत सामंजस्य करार; RuPay कार्डची सुविधा देखील जोडणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील UPI आणि RuPay ग्राहक लवकरच PayExpert च्या पॉइंट-ऑफ-सेल डिव्हाइसद्वारे युनायटेड किंगडम (युके) मधील स्टोअरमध्ये पेमेंट करू शकतील. 'NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड' (NIPL), 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' (UPI) आणि 'RuPay कार्ड योजना' (RuPay) यांनी 18 ऑगस्टला UK मधील PayXpert पेमेंट सोल्यूशन्स प्रदातासमवेत सहकार्य करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

हा करार आंतरराष्ट्रीय स्तरावर पेमेंट सोल्यूशन्स स्विकारण्यासाठी केला गेला आहे. हे सहकार्य यूकेमधील सर्व PayXpert Android पॉइंट-ऑफ-सेल (POS) डिव्हाइसेसवर स्टोअरमधील पेमेंटसाठी भारतीय पेमेंट सोल्यूशन उपलब्ध असल्याची खात्री करेल. हे UPI-Best QR कोड पेमेंटसह सुरू होईल आणि RuPay कार्ड पेमेंट नंतर जोडले जातील.

भारतीय प्रवाशांना पेमेंट करणे होणार अधिक सोपे
PayExpert आणि NPCI ने संयुक्तपणे एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले की, दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांसह अर्धा दशलक्षाहून अधिक (5 लाख) भारतीय यूकेमध्ये प्रवास करतात. पुढील काही वर्षांत ही संख्या झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीयांना आपले पेमेंट करण्यासाठी हा सामंजस्य करार सोयीस्कर ठरणार आहे. UPI आणि RuPay पेमेंट पर्यायामुळे संपूर्ण यूकेमधील ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांना फायदा होईल. या करारामुळे किरकोळ, आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रांनाही चालना मिळेल.
UPI आणि RuPay हे खूप चांगले पर्याय
PayXpert चे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड आर्मस्ट्राँग म्हणाले की, UPI आणि RuPay पेमेंट योजना या POS उपकरणांवर उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय पेमेंट पर्यायांच्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये जोडण्यासाठी उत्तम नाव आहेत. हे यूकेमध्ये आमच्यासाठी संधीचे संपूर्ण नवीन क्षेत्र उघडेल आणि व्यापार्‍यांसाठी आमची समाधान क्षमता आणखी मजबूत करेल.

भारतीय PayExpert च्या PoS द्वारे पेमेंट करू शकतील
एनपीसीआय इंटरनॅशनल कंपनीचे इंटरनॅशनल बिझनेस-पार्टनरशिप मार्केटिंगचे प्रमुख अनुभव शर्मा म्हणाले की, यूकेमध्ये प्रवास करणारे भारतीय PayExpert च्या PoS डिव्हाइसेसद्वारे UPI च्या पेमेंट प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकतील. हे सहकार्य आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही भविष्यात देखील त्यात रुपे कार्ड पेमेंट सुविधा जोडण्याचा विचार करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...