आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Nirmala Sitharaman GST Council Meeting; Petrol Diesel Price Cheaper By Up To Rs 30 And Rs 25 Per Litre; News And Live Updates

GST कौन्सिलची उद्या बैठक:पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर किंमत 28 रुपयांनी कमी होईल, 84 रुपये होऊ शकते पेट्रोलची नवीन किंमत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल-डिझेलवरील करांच्या बाबतीत केंद्र सरकार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्या लखनऊ येथे जीसटी परिषदेची 45 वी बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षखालील समिती हा मुद्दा मांडणार आहे. पेट्रोल आणि डिझेल जर जीएसटीच्या कक्षेत आले तर सध्याच्या किंमतीमध्ये मोठा फरक पडू शकतो.

या निर्णयानुसार, पेट्रोल 28 रुपयांनी तर डिझेल 25 रुपयांनी स्वस्त होणार आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेल उच्चांकी गाठली आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल शंभरी पार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कोरोनापूर्व स्तरावर आला आहे. यामुळे पेट्रोलच्या दरातही वाढ होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कसे ठरवले जातात?
जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलची किंमत ठरवत असे आणि दर 15 दिवसांनी ते बदलले जात असे, पण 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलची किंमत ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलची किंमतही सरकारने निश्चित केली होती, पण 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांना दिले.

म्हणजेच पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ठरवण्यावर सरकारचे नियंत्रण नाही. तेल विपणन कंपन्या हे काम करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक किंमत आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात.

बातम्या आणखी आहेत...