आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांच्याशी भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्जाच्या असुरक्षिततेसह इतर प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय त्यांनी त्यांचे सौदी अरेबियाचे समकक्ष मोहम्मद अलजद्दान यांच्याशीही बैठक घेतली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ग्रीनबेल्ट, मेरीलँड येथील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरलाही भेट दिली.
IMFच्या चिंतेची अर्थमंत्र्यांनी घेतली दखल
गीता गोपीनाथ यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान, अर्थमंत्र्यांनी आर्थिक क्षेत्रातील तणाव, वाढता वास्तविक व्याजदर, उच्च कर्ज, महागाई, भू-राजकीय विखंडन आणि चीनमधील ढासळलेली वाढ यासह अर्थव्यवस्थेला पडणाऱ्या जोखमींवरील IMFच्या चिंतेची दखल घेतली.
जागतिक बँक गट (WBG) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या स्प्रिंग मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आठवडाभराच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. सीतारामन यांच्यासोबत या दौऱ्यात अर्थ मंत्रालयाचे काही अधिकारीही हजर होते.
मोहम्मद अलजदान यांच्यासोबत जागतिक महागाईवर चर्चा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे सौदी अरेबियाचे समकक्ष मोहम्मद अलजदन यांच्याशी जागतिक बँकेच्या उत्क्रांतीच्या रोडमॅपवर चर्चा केली. G20 च्या भारताच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या बहुपक्षीय विकास बँकांच्या बळकटीकरणावरील तज्ज्ञ गटावरही चर्चा करण्यात आली.
याशिवाय दोन्ही नेत्यांनी जागतिक महागाईच्या मुद्द्यांवर चर्चा केली. वाढत्या जागतिक कर्जाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि कॉमन फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या तातडीच्या गरजेवरही या बैठकीत भर देण्यात आला.
गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरला दिली भेट
निर्मला सीतारामन यांनी नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरला देखील व्हिजिट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधूही होते. राजदूत संधू यांनी छायाचित्रे ट्विट करून लिहिले, 'हबल आणि जेम्स वेब दुर्बिणीसाठी प्रसिद्ध असलेल्या नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची आणि माहितीपूर्ण भेट. ISRO आणि NASA यांच्यातील अंतराळ सहकार्य हा भारत-अमेरिका भागीदारी अधिक दृढ करण्याचा प्रमुख आधारस्तंभ आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वेळापत्रक
हे ही वाचा सविस्तर
हिंसाचार:तर मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असती का? पाकमध्ये अल्पसंख्याकांच्या संख्येत घट : अर्थमंत्री निर्मला सीतारामन
अमेरिकेतील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी भारतातील मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विधान केले. अर्थमंत्री म्हणाल्या की, हे मत अशा लोकांनी बनवले आहे जे कधी भारतातही आले नाहीत. भारतात मुस्लिमांविरोधात हिंसाचार झाला असता तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का? जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.