आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Nirmala Sitharaman News | Finance Minister Nirmala Sitharaman Press Conference Economy Package Details Announcement Latest News Updates On India Coronavirus Outbreak

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 लाख कोटी:अर्थमंत्री निर्मला सीतारमण 4 दिवसांत सांगतील कसे राहील 20 लाख कोटींचे पॅकेज; आज संध्याकाळी 4 वाजता पहिली घोषणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 वाजता काय सांगणार अर्थमंत्री? सर्वांच्या नजरा निर्मला सीतारमण यांच्याकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारच्या संबोधनात अर्थव्यवस्थेला भरारी देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज कशा स्वरुपाचे असेल आणि याचे ब्रेक-अप कसे होईल यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 4 दिवसांत सविस्तर प्लॅन सांगणार आहेत. याच हेतूने त्या आज संध्याकाळी 4 वाजता पहिली घोषणा देखील करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींनी घोषित केलेल्या पॅकेजमध्ये चार एल अर्थात लँड, लेबर, लॉ आणि लिक्विडिटी यावर फोकस राहणार आहे. हे चारही मुद्दे चार दिवसांत रोज जाहीर केले जातील.

12 लाख कोटींच्याच पॅकेजचा मिळेल ब्रेक-अप

उल्लेखनीय बाब म्हणजे, 20 लाख कोटी रुपयांपैकी जवळपास 8 लाख कोटी रुपयांची घोषणा आधीच सरकार आणि आरबीआयने केली आहे. आता 12 लाख कोटी रुपयांचा ब्रेक-अप प्लॅन दिला जाणार आहे. यातून 50,000 कोटी रुपये करासाठी घोषित केले जाऊ शकतात. तर ऊर्जा क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपये जारी होऊ शकतात. याचप्रकारे देशातील गरीबांना थेट ट्रांसफर योजनेत एक मोठी रक्कम दिली जाऊ शकते. यामध्ये एनबीएफसी आणि हाउसिंग फायनांस कंपन्यांना जवळपास एक लाख कोटी रुपये दिले जाऊ शकतात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 3 लाख कोटींची शक्यता

तिसऱ्या आण चौथ्या दिवशी सेक्टरल सुधारणांवर भर दिला जाऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने हवाई प्रवास, उत्खनन, संरक्षणावर भर दिला जाईल. सरकार अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सुधारणांवर लक्ष घालणार आहे. या पॅकेजमध्ये एसएमई (छोट्या कंपन्या, उद्योग) आणि कृषी क्षेत्रावर भर दिला जाईल. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार 3 लाख कोटी आणि छोट्या उद्योगांसाठी 2.5 लाख कोटी रुपयांची घोषणा केली जाऊ शकते. असंगठित क्षेत्र, जसे की फळ-भाजीपाला विक्रेते यांना देखील एक मोठी रक्कम जाहीर केली जाऊ शकते. गृहनिर्माण क्षेत्राला सुद्धा मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री या घोषणा काही टप्प्यांमध्ये जारी करू शकतात. त्यामुळे, त्या पहिल्या दिवशी जमीन किंवा मजुरांवर भर देतील अशी शक्यता आहे. सरकारच्या या पॅकेजमध्ये छोटे उद्योग, एव्हिएशन आणि फायनांस सेक्टर मजबूत होतील. सरकार लिक्विडिटीच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांना एकाचवेळी फायदा करून देण्याच्या प्रयत्नात आहे असेही वृत्त आहे. लिक्विडिटीचा अर्थ बँकांच्या माध्यमातून पैसा दिला जाणार आहे. हा पैसा जमीन, कंस्ट्रक्शन, एनबीएफसी इत्यादी क्षेत्रांना अनुसरून असेल. सरकार टॅक्स स्लॅबमध्ये बदल करू शकते. तसेच इंपोर्ट ड्युटी सुद्धा वाढवली जाऊ शकते. यातून 20 लाख कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्यात सरकारला देखील मदत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...