आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Nirmala Sitharaman Press Conference Update; Finance Minister Meets GST, Income Tax Officials; News And Live Updates

बँक कर्मचाऱ्यांचे वाढणार पेन्शन:30 ते 35 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते पेन्शन; यापूर्वी 9,284 रुपये मिळत होते

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली

बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, केंद्र सरकार आता बँक कर्मचाऱ्यांना आता 30 ते 35 हजार रुपयापर्यंत पेन्शन देणार आहे. अशी माहिती आर्थिक विभागाचे सचिव देबाशिष पांडा यांनी ही माहिती दिली आहे.

अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती
पांडा म्हणाले की, पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन पेआउट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 14% वाढ करण्यात आली आहे. हे यापूर्वी ते 10% होते. यासोबतच कोरोनाकाळात मृत्यूमुखी पडलेल्या सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ त्यांच्या शेवटच्या पगाराच्या आधारे करण्यात आली असलयाचे यावेळी सांगण्यात आले आहे.

बँकांनी केले सादरीकरण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे मुंबईत दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. भेटीनंतर अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. त्या म्हणाल्या की, बँकांनी त्यांचे सादरीकरण केले असून स्वावलंबी भारताची संपूर्ण माहिती दिली आहे. उद्योगाला आता बँकांव्यतिरिक्त इतर मार्गांद्वारे पैसे उभारण्याची संधी आहे. बँकाही बाजारातून पैसे गोळा करत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी राज्य सरकारांबरोबर काम केले पाहिजे. एक जिल्हा एक उत्पादनासाठी काम करायला हवे. बँका यासाठी सामान्य इन्फ्रा प्लॅटफॉर्म बनवू शकतात असे निर्मला सितारमण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली
सीतारमण म्हणाल्या की, भारतीय सरकारी बँकांनी कोरोना काळात चांगली कामगिरी बजावली. त्यांचा आता आपल्याला लाभ मिळत आहे. कोरोनापूर्वी लहान बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या. यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण आली नसून बँका चांगले काम करत आहेत. बँका विलीनीकरणाशी संबंधित सर्व कामे चांगल्या प्रकारे होत आहे असल्याचे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...