आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 एप्रिलला पब्लिक सेक्टर बॅंकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत अर्थमंत्री सरकारी योजनांची कामगिरी आणि अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर चर्चा करतील.
यासोबतच कर्ज देणाऱ्या संस्थांच्या कामगिरीचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक प्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची ही पहिलीच बैठक असेल.
ECLGS ची होणार समीक्षा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विविध सरकारी योजनांची प्रगती आणि विविध आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. कर्ज सुविधा हमी योजना (ECLGS)देखील असेल. यंदाच्या अर्थसंकल्पात ECLGS मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
बॅंकींग सेक्टरचा ठरु शकतो अजेंडा
सुत्रांनी दिलेल्या माहितीमुसार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीत संपूर्ण वर्षभरासाठी बँकिंग क्षेत्राचा अजेंडा ठरवला जाऊ शकतो. या बैठकीत सरकार अर्थव्यवस्थेच्या बँकांना गती देण्यासाठी उत्पादक क्षेत्रांना कर्ज वाटप वाढवण्यास सांगू शकते.
असे देखील सागंण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.