आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:नोटांवरील महात्मा गांधींचा चेहरा बदलण्याचा प्रस्ताव नाही : आरबीआय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चलनी नोटांवर महात्मा गांधींचा चेहरा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.एका निवेदनात, मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विद्यमान चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचा चेहरा बदलून इतरांच्या चेहऱ्यावर बदल करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी, असे त्यात म्हटले आहे. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक काही विशिष्ट मूल्यांच्या नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह इतर प्रमुख भारतीयांचे चेहरे वापरण्याचा विचार करत असल्याचे सूचित करणारे वृत्त देण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...