आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर GUIDE:आजपासून कच्चे बिल नाही, ई-इन्व्हॉइस 50 कोटी वा जास्त उलाढालीवर सक्तीचे

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ एप्रिलपासून ५० कोटीवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठी ई-इन्व्हॉइस सक्तीचे असेल. आता व्यावसायिकांना सध्याची बिलिंग सिस्टिम या ई-इन्व्हॉइसच्या हिशेबाने तयार करावे लागेल. सर्व बिझनेस इन्व्हॉइसिंगला ई-इन्व्हॉइसिंगची किमान आवश्यकता पूर्ण करावी लागेल. ई-इन्व्हाॅइसिंग काय असते आणि हे कसे काम करते ते समजून घेऊया...

काय आहे ई-इन्व्हॉइसिंग?
ई-इन्व्हॉइसचा अर्थ इलेक्ट्रॉनिक रूपात तयार केलेल्या बिलाशी आहे. जे पुढे जाऊन जीएसटी पोर्टलवर उपयोगासाठी सरकारी इन्व्हॉइस नोंदणी पोर्टलच्या(अायआरपी) माध्यमातून प्रमाणित केले जाईल. आयआरपीच्या माध्यमातून जाणाऱ्या प्रत्येक इन्व्हॉइसला एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. हे विवरण ग्राहकासाठी(इन्व्हॉइस प्राप्तकर्ता) उपलब्ध होईल.

ई-इन्व्हॉइसचा काय उपयोग?
या डिजिटल दस्तऐवजाचा उपयोग ग्राहक आपल्या देवाण-घेवाणीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी करू शकतात. कर अधिकारी याचा वापर कर निर्धारणासाठीही करू शकतात. या माध्यमातून जीएसटीआर-१ व जीएसटीआर-२ए/बी सारखे जीएसटी रिटर्न स्वत: भरू शकतील.

ई-इन्व्हॉइसमुळे व्यवसायात काय बदल येईल?
प्रत्येक बिझनेस टू बिझनेस(बी टू बी) देवाणघेवाणीवर सरकारची निगराणी असेल. कच्च्या बिलाचे चलन पूर्णपणे समाप्त होईल, कारण पूर्ण पुरवठा साखळी ई-इन्व्हॉइसिंगच्या माध्यमातून संचालित होईल. होलसेल विक्रीचे आकडे कर विभागाच्या अधिकाऱ्यांना ई-इन्व्हॉइसच्या माध्यमातून आधीपासून मिळतात. आता रिटेल विक्रीचे आकडेही त्यांच्या पोहोचमध्ये असतील.

ई-इन्व्हॉइस केले नाही तर?
लक्षात ठेवा, बीटूबी इन्व्हॉइसची रिअल टाइम रिपोर्टिंग होईल, यामुळे या पुरवठा साखळीत समाविष्ट सर्व व्यवसायाना ई-इन्व्हॉइसचे पालन करणे आवश्यक आहे. ई-इन्व्हॉइसचा उपयोग न केल्यास प्रति इन्व्हॉइस १०,००० रु. दंडाची तरतूद आहे.

व्यावसायिकांना ई-इन्व्हॉयसिंगचा काय फायदा होईल?
पूर्ण जगात डिजिटायझेशन होत आहे. ई-इन्व्हॉइसिंगद्वारे बिझनेस आणि बिलिंगची सध्याची प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटाइज होईल. लेखाजोखा आणि डेटा एंट्रीचे बहुतांश काम स्वयंचलित होईल आणि मॅन्युअल काम घटेल. प्रत्येक देवाणघेवाणीचे अचूक आणि कालबद्ध रेकॉर्ड मेंटेन असेल. चुकीची शक्यता कमी होईल आणि वेळेवर पेमेंट घेण्यास सुलभता होईल.

अर्चित गुप्ता, संस्थापक व सीईओ, क्लिअर टॅक्स

बातम्या आणखी आहेत...