आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियाने लॉंच केला नवीन बजेट स्मार्टफोन:Nokia C31 ची किंमत 9,999 रूपये; 6.7 इंच HD डिस्प्ले अन् ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकियाने नवीन बजेट स्मार्टफोन C31 लॉन्च केला आहे. यात 3 GB RAM सह 32 GB पर्यंत स्टोरेज असणार आहे. हा फोन 6.7 इंच HD डिस्प्ले सह येईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. या फोनची सुरूवातीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे.

Nokia C31 दोन प्रकारात लॉन्च झाला

कंपनीने Nokia C31 स्मार्टफोन दोन प्रकारात लॉन्च केला आहे. त्याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर त्याच्या 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

फोनची बॅटरी क्षमता असेल 5,050mAh
नोकियाच्या या फोनला पॉवर देण्यासाठी 5050mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन एका चार्जमध्ये 3 दिवसांची बॅटरी लाइफ देईल. नोकियाच्या मते C31 चा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

सुरक्षेसाठी फेस अनलॉक, फिगरप्रिंट सेन्सर
हँडसेटमध्ये सुरक्षेसाठी फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी नोकिया C31 मध्ये ब्लूटूथ, 3.5 मिमी हेडफोन जॅक, वाय-फाय, मायक्रो यूएसबी पोर्ट, जीपीएस, ए-जीपीएस आणि एलटीई सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोन 4G कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध असेल.

हा स्मार्टफोन तीन रंगात असेल उपलब्ध

हा फोन चारकोल, मिंट आणि सायन कलर वेरिएंट या तीन रंगांच्या पर्यांयामध्ये तुमच्याकडे येतो. कंपनीने या फोनच्या विक्रीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, हा स्मार्टफोन नोकियाच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...