आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०२० मध्ये २२,८५६ कोटींची निर्यात, २०१९च्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत आलेल्या उसळीमुळे या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत बिगर बासमती तांदळाचे भाव १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. तांदळाच्या गिरण्यांनुसार, जूनपर्यंत किमतीत तेजी राहण्याची शक्यता आहे. यानंतर बिगर बासमती तांदळाचा भाव घसरायला सुरुवात होईल. यादरम्यान बासमतीचा भाव जवळजवळ स्थिर राहिला. देशात ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या बासमती तांदळाचा वापर करते. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर २०२० मध्ये २२,८५६ कोटी रु. मूल्याच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली. ही एक वर्ष आधी या अवधीत झालेल्या १०,२६८ कोटी रुपयांच्या निर्यातीपेक्षा दुपटीहून जास्त आहे. बांगलादेशाने भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी सुरू केली आहे. बांगलादेशाला भारताच्या तांदळाची निर्यात वाढण्याचे कारण म्हणजे तेथील सरकारने तांदळावर आयात शुल्क ६२.५ टक्क्यांवरून घटून २५ % केले आहे. बांगलादेश या वर्षी सुमारे ५ लाख टन बिगर बासमती तांदूळ आयात करेल. तेथील आयातदारांनी काही भारतीय निर्यातदारांसोबत करारही केला आहे. बांगलादेशाशिवाय नेपाळ, यूएई, सोमालिया, गयाना आणि अमेरिकेसह युरोपच्या काही देशांनाही भारत बिगर बासमती तांदूळ निर्यात करतो.
७ लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त पुरवठा
कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, देशात पीक वर्ष २०२०-२१ दरम्यान तांदळाचे एकूण उत्पादन १.२ टक्के वाढून १२.०३२ कोटी टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचेल. अशा स्थितीत एकूण वापर आणि निर्यातीच्या तुलनेत पुरवठा ७.२० लाख टन जास्त राहण्याचा अंदाज आहे. याआधी जूननंतर किमतीत नरमाई येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.