आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Non Creamy Layer Certificate | How To Apply Online Proces | Aaple Sarkar Online Webportal, Latest News  

ऑनलाईन कसा काढणार नॉन क्रिमिलेयर दाखला:जाणून घ्या- काय लागतात कागदपत्रे, कशी करायची प्रक्रिया

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर दाखला गरजेचा असतो. महाविद्यालयात शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय किंवा निमशासकीय, शासनमान्य अनुदानित संस्थेत नोकरीला लागण्यासाठी उमेदवाराला नॉन क्रिमिलेयर दाखला बंधनकारक असतो.

नॉन क्रिमिलेयर दाखला जर तुमच्याकडे नसेल तर विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक अधिनियमात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणे महत्त्वाचे असते. एका वर्षांसाठी हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते, त्यानंतर तुम्ही ते नवीन बनवू शकता. चला तर आज आपण जाणून घेऊया, नॉन क्रिमिलेअर दाखला ऑनलाईन कसा काढायचा.

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया, खालील पायऱ्यांद्वारे करू शकता अर्ज

 • नॉन क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी 'आपले सरकार'ची खालील वेबसाईड ओपन करा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
 • संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर न्यू यूजर्स पर्यायावर क्लिक करा.
 • तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी लागेल.
 • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड येईल,
 • तो टाकल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे, त्याचबरोबर खाली आलेला कॅप्चा कोड टाकायचा व लॉगिन करायचे.
 • त्यानंतर तुमच्या समोर आपले सरकारचे पेज ओपन होईल. त्या पेजवर उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषेचा पर्याय निवडा.
 • त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील. तिथे तुम्हाला 'महसूल विभाग' हा पर्याय निवडायचा. तर उपविभागमध्ये महसूल सेवा निवडा.
 • या विभागाची निवड झाल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल. त्यातील नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करायचे, 'पुढे जा' यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावरील नॉन क्रिमिलेयर पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे हा पर्याय येईल. तेव्हा तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
 • (किमान कागदपत्र- पॅन कार्ड, पासपोर्ट, आरएसबीवाय कार्ड, पाणी बिल, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, मनरेगा जॉब कार्ड, अर्जदाराचा फोटो, मालमत्ता कराची पावती, शासकीय किंवा निमशासकीय संस्थांनी दिलेली ओळखपत्र) पत्याचा पुरावा किमान एक लागतो.
 • अनिवार्य कागदपत्रे - उत्पन्नाचा पुरावा, जातीसाठी प्रतिज्ञापत्र, स्वतःसाठी जातीचा पुरावा)
 • आवश्यक कागदपत्रे पाहा त्यानंतर 'पुढे जा' या क्लिवर करा.
 • नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र हे पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला एक फॉर्म आलेला दिसेल. 'अ‌ॅप्लिकेशन फॉर्म' या फॉर्ममध्ये दाखवल्याप्रमाणे माहिती भरा.
 • अर्जदाराचे तपशील - नॉन क्रिमिलेयर दाखला रिन्यू करायचा आहे की नवीन काढायचा आहे. ते पहिल्यांदा विचारेल त्या ठिकाणी तुम्ही गरजेनुसार पर्यायाला निवडू शकता. ​​​
 • लाभार्थी अनुसूचित जाती/ वर्ग तपशील - यात जात, वर्ग आणि नॉन-क्रिमिलेयर दाखवल्याचा कालावधी निवडा.
 • पूर्वीच्या नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा तपशील - जर नॉन क्रिमिलेयर दाखला रिन्यू करायचा असेल तर जुन्या दाखल्याचा नंबर आणि जारी केल्याचे ठिकाण येथे टाकायचा
 • लाभार्थीच्या वडिलांचे/पतीचे तपशील - लाभार्थीच्या वडिलांचे किंवा पतीचे तपशील येथे भरा. उत्पन्न तपशील, कौटुंबिक तपशील सविस्तर भरायचा.
 • इतर तपशील - या पर्यायात नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र कशासाठी पाहिजे, याबाबत माहिती लिहायची.
 • कराराचे तपशील - यामध्ये संपूर्ण माहिती 'मला मंजूर' या पर्यायावर क्लिक करायचे. शेवटी सेव्ह बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला अर्ज नंबर मिळेल. त्यानंतर फोटो, सर्व आवश्यक डाक्युमेंट अपलोड करायचे.
 • त्यानंतर पैसे भरणा हा पर्यायावर क्लिक करा, ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरू शकता.
 • तुम्हाला अर्ज केल्यापासून 15 ते 21 दिवसात तुमचा दाखला मिळेल.

सूचना - सदर माहिती ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म व आपले सरकार या संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे, ऑनलाईन कागदपत्र काढताना काही अडचण संभवल्यास तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्राशी संपर्क करू शकता.

हे ही वाचा

बातम्या आणखी आहेत...