आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी, अदानींना टक्कर:आता इंडियन ऑइल कंपनीही करणार ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी समूहाप्रमाणेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) देखील हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. देशातील सर्वात मोठ्या या तेल रिफायनरीने लार्सन अँड टुब्रो आणि रिन्यू पॉवर यांच्याशी संयुक्त सहकार्य करार करणार आहे. या करारांतर्गत स्थापन झालेली नवीन कंपनी देशात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे.

इंडियन ऑइल आणि एलअँडटी यांनी ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलायझर्सचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठीही एक स्वतंत्र संयुक्त सहकार्य करार केला आहे. आयओसी, एलअँडटी आणि रिन्यू पाॅवर या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत.

असा हाेताे ग्रीन हायड्रोजन
ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्याचे रेणू हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये मोडले जातात. तथापि, हायड्रोजनच्या निर्मितीसाठी कोळसा आणि नैसर्गिक वायूचा वापर केला जातो, ज्यामुळे लक्षणीय प्रदूषण होते. परंतु जर हायड्रोजनच्या निर्मितीमध्ये अक्षय ऊर्जा वापरली गेली आणि त्यातून कार्बन उत्सर्जित होत नसेल तर त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...