आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:दीड वर्षात फक्त 4% राहील एनपीए, 10 वर्षांत सर्वात कमी

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांची कर्ज वसुली (एनपीए)ची समस्या संपत चालली आहे. क्रिसिलच्या एका अहवालानुसार, मार्च २०२३ पर्यंत बँकांचा सकल एनपीए ०.९०% कमी होऊन ५% राहण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर मार्च २०२४ पर्यंत स्थिती आणखी सुधारत बँकांचा सकल एनपीए फक्त ४% राहण्याचा अंदाज आहे, ते एका दशकातील सर्वात कमी असेल.

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोविड महामारीनंतर अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा झाली आहे. त्यामुळे एनपीए झालेल्या कर्जाची वसुली होत आहे. याशिवाय कर्ज काढण्याचे प्रमाणही वाढले असून काही राइट ऑफ वसुली होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सकल एनपीए सातत्याने कमी होत आहे. येत्या काही वर्षांत हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. एनपीएची घटना बँकांची स्थिती सुधारण्याचे सर्वात मजबूत लक्षण मानले जाते.

बँकांचा एनपीए तीन मुख्य कारणांमुळे कमी असेल 1. बँका त्यांचे काही भाग किंवा सर्व एनपीए मालमत्ता पुनर्रचना कंपनीला विकू शकतील. 2. अर्थव्यवस्था रुळावर आल्याने उद्योगधंदे परत येऊ लागले, बँकांची कर्जे परतली. 3. बँकांनी पाच वर्षांत १० लाख कोटींची कर्जे राइट ऑफ केली, एनपीए कमी झाला.

कॉर्पोरेट एनपीए १६% वरून २% वर येणार क्रिसिलच्या मते, २०२३-२४ पर्यंत कॉर्पोरेट कर्जातील एनपीए पातळी २% च्या खाली येण्याची अपेक्षा आहे. ३१ मार्च २०१८ रोजी कॉर्पोरेट कर्जातील एनपीए पातळी १६% होती.

माफ केलेली कर्जेही परत येत आहेत एलकेपी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, राइट ऑफ कर्जदेखील परत येऊ लागले आहेत. गेल्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाच्या २५-३०% कर्जाची परतफेड झाली.

चार वर्षांत सकल एनपीए जवळपास निम्म्याने घसरला कालावधी एनपीए मार्च-2018 11.2% मार्च-2019 9.1% मार्च-2020 8.2% मार्च-2021 7.3% मार्च-2022 5.9% मार्च-2023* 5% मार्च-2024* 4% (*अंदाजे, स्रोत: आरबीआय,बँँक रिपोर्ट्स, ख्रिसिल)

बातम्या आणखी आहेत...