आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थिती बदलली:गृहनिर्माण क्षेत्रामध्ये एनआरआय वाढवू शकतात 12% गुंतवणूक

नवी दिल्ली/बंगळुरू|14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रात, सामान्यपणे हाउसिंग सेगमेंटमध्ये अनिवासी भारतीय (एनआरआय)ची गुंतवणूक पुन्हा वाढू लागली आहे. २०२० आणि २०२१मध्ये कोरोनाविषयी निर्बंधांमुळे एनआरआयचा मालमत्तेत गुंतवणूक कमी झाली होती. मात्र २०२२ दरम्यान गृहनिर्माण मालमत्तेत एनआरआयची गुंतवणूक १.२३ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

देशाचे मालमत्ता सल्लागार, रिअल इस्टेट विकासक आणि दोन दिवसांआधी सिंगापूरमध्ये झालेल्या प्रॉपर्टी एक्स्पोमधून जो कल समोर आला, त्यानुसार एनआरआय होम टाऊनमध्ये मोठे घर विकत घेत आहेत. परताव्याची अपेक्षा आणि परवडणाऱ्या किमतीत मालमत्ता मिळणे, मोठ्या टेक कंपन्यांमधील कपात हे याचे प्रमुख कारण ठरत आहे. गुंतवणुकीव्यतिरिक्त, परदेशात नोकरी गमावल्यानंतर मायदेशी परतण्याची योजना आहे.

गृहनिर्माण मालमत्तेत एनआरआयची गुंतवणूक वाढण्याची चार कारणे 1. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत घसरणाीमुळे भारतात स्वस्त पडतेय घर. 2. भारतात घरांच्या किमती वाढू लागल्या आहेत. यामुळे गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. 3. बहुतांश देशात हाउसिंग प्रॉपर्टीची मागणी आणि भाव स्थिर आहेत किंवा कमी होत आहेत. 4. तंत्रज्ञान कंपन्यांत कपातीमुळे एनआरआय भारतात कायमस्वरूपी राहण्याच्या तयारी आहेत.

७७% एनआरआयची पसंत मोठे घर अॅनारॉकच्या सर्वेक्षणानुसार, देशात घर विकत घेणारे ७७% एनआरआय ९० लाखांपासून २.५ कोटी रुपयांपर्यंतचे मोठे घर विकत घेऊ इच्छित आहेत. ७१% एनआरआय गृहनिर्माण मालमत्तेत गुंतवणुकीचे शेअर, गोल्ड, एफडीपेक्षा जास्त महत्त्व देत आहेत. गुंतवणुकीच्या हिशेबाने बंगळुरू, हैदराबाद आणि एनसीआर पहिल्या क्रमांकावर आहेत.

घर विकत घेणाऱ्यांमध्ये ७०% गुंतवणूकदार क्रेडाई (पुणे मेट्रो)चे अध्यक्ष फरांदे स्पेसेसचे चेअरमन अनिल फरांदे यांनी सांगितले की, गृहनिर्माण क्षेत्रात ३०% मागणी अशा एनआरआयची आहे, जे भारतात येऊ इच्छित आहेत. ७०% एनआरआयला भारतात प्रॉपर्टी परवडणारी दिसत आहे. भविष्यात परतावा मिळेल.

आखाती देशातील एनआरआयला जास्त रस आखाती देशात राहणाऱ्या एनआरआयची भारताच्या गृहनिर्माण क्षेत्रात एकूण गुंतवणुकीत ४०-४५% भागीदारी आहे. अमेरिका, सिंगापूर, ब्रिटनच्या एनआरआयची भागीदारी ३०-३५% आहे. शिवाय जर्मनी, केनिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात मोठ्या प्रमाणात गंुतवणूक आहे.

टिअर-२ शहरांतही घरे खरेदी करताहेत एनआरआय ^कोरोनानंतर हाउसिंग प्रॉपर्टीत मागणी वाढत आहे. एनआरआय लक्झरी घरात गंुतवणूक करत आहेत. टिअर-२ शहरांत एनआरआय घर विकत घेत आहेत. अनुज पुरी, चेअरमन, अॅनारॉक ग्रुप

बातम्या आणखी आहेत...