आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Office Space Rents Will Increase By 14 Per Cent To 60 Million Square Feet In Eight Cities

दिव्य मराठी विशेष:कार्यालयीन जागा भाड्याने देण्याचे प्रमाण 14 टक्के वाढून 8 शहरांमध्ये 60 दशलक्ष चौरस फूट होईल

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यतः भारतीय अर्थव्यवस्था भक्कम प्रकारे रुळावर आल्याने आणि आयटी, आयटीईएस क्षेत्रातील तसेच स्टार्टअप्समधील आक्रमक नोकरभरती योजनांमुळे आठ शहरांमध्ये कार्यालयीन जागेची मागणी यावर्षी १४ टक्क्यांनी वाढून ६० दशलक्ष चौरस फुटांपर्यंत पोहोचू शकते. असे रिअल इस्टेट सल्लागार कुशमन अँड वेकफिल्ड यांनी मत व्यक्त केले आहे.

आकडेवारीनुसार, आठ प्रमुख शहरांमधील कार्यालयीन जागेचे एकूण भाडेपट्ट्ा २०२१ मध्ये वाढून ५२.२७ दशलक्ष चौरस फूट झाले. जे मागील वर्षी ४९.४२ दशलक्ष चौरस फूट होते. दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद ही आठ शहरे आहेत. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, आयटी सारख्या ज्ञानावर आधारित क्षेत्रातील लक्षणीय विस्तार, नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स ची स्थापना आणि एक मजबूत स्टार्ट-अप प्रणाली जी नवीन युनिकॉर्नला जन्म देत आहे सर्व या वाढीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत असे कुशमन अँड वेकफिल्डचे(भारत) व्यवस्थापकीय संचालक बादल याज्ञिक यांनी सांगितले.पाच ट्रिलियन डॉलरच्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताची सुरू असलेली वाटचाल व्यावसायिक कार्यालयीन बाजाराच्या वाढीसाठी अनेक संधी देणारी असल्याचे याज्ञिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...