आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमोडिटी रिपोर्ट:मोहरीच्या तुटवड्यामुळे एक महिन्यापासून तेल गिरण्या बंद

भरतपूर / प्रमोद कल्याण25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये दुप्पट क्षमतेने झालेल्या पेरणीचा साइड इफेक्ट

कोरोना काळात मोठ्या जोमाने सुरू असलेला मोहरीच्या तेलाचा उद्योग आता अनलॉकच्या काळात गेल्या एका महिन्यापासून बंद आहे. याचे कारण म्हणजे, कच्चा माल म्हणजे, मोहरीचा तुटवडा आहे. मोहरी मिळत नसल्याने महिनाभरापासून तेल गाळपाचे काम बंद आहे. तेल उद्योगाच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. अशी स्थिती आणखी सव्वा महिना राहील. म्हणजे नवीन मोहरीची आवक झाल्यावर तेल गिरण्यांची चाके फिरतील. मोहरीच्या कमतरतेमुळे मोहरी पट्टा, मध्य प्रदेशचा भिंड, मुरैना, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेशचे आग्रा, मथुरा व राजस्थान धौलपूर, भरतपूर, अलवर, करौली, सवाई माधोपूर, कोटा, बारा, बुंदीपासून गंगानगरपर्यंत आहे. भरतपूर मोहरी पिकाचे कोठार आहे. मस्टर्ड ऑइल प्रोड्युसर असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस कृष्णकुमार अग्रवाल म्हणाले, कोराना काळात मोहरी तेलाची माेठी मागणी हाेती. तेल गिरण्यांनी दीड ते दुप्पट क्षमतेसोबत मोहरीचे गाळप केले होते.

या वर्षी १०० लाख टन मोहरीचा अंदाज
राष्ट्रीय मोहरी संशोधन केंद्राचे संचालक पी. के. राय यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मोहरी पीक चांगल्या वाढीचे आहे. हवामान अनुकूल राहिल्याने क्षेत्रही वाढले आहे. देशात या वर्षी १०० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांना मोहरीच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही.

राजस्थानच्या मोहरीची प्रतीक्षा
फेब्रुवारीत पंजाब आणि हरियाणातून मोहरी येऊ लागते, मात्र या वेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे या दोन राज्यांतून मोहरी येत नाही. राजस्थानची मोहरी मार्चच्या सुरुवातीपासून येईल. त्यानंतर मोहरीची उपलब्धता वाढेल. - अनुज गुप्ता, एव्हीपी रिसर्च, एंजेल ब्रोकिंग

नवी मोहरी आल्यावर किमती पडतील
नव्या मोहरीचे पीक आल्यानंतर किमतीत घट येण्याची शक्यता आहे. ब्रोकर पुनीत गोयल म्हणाले, मोहरी पट्ट्यात नवे पीक योग्य पद्धतीने आवक मार्चच्या सुरुवातीला होईल. या वर्षी ९० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मोहरीचा भाव ५ हजार रुपयांपेक्षा खाली येईल. अशा स्थितीत कारखाने आणि स्टॉकिस्ट सध्या शांत आहेत.

नवी मोहरी येण्यास एक महिना लागेल
नव्या मोहरी पिकाची आवक होण्यास महिनाभराचा विलंब आहे. प्रतापगड, नीमच, निंबाहेडा, कोटा मंडीत नवी मोहरी येत आहे. मात्र, यामध्ये आर्द्रता खूप आहे आणि भावही जास्त आहे. प्रमुख अाडते भुपेंद्र गोयल यांच्यानुसार, या बाजार समित्यांत बुधवारी नव्या मोहरीचा भाव ५६०० रु. क्विंटल होता. आर्द्रता असल्याने तेलाचा रंग हिरवा राहतो.

बातम्या आणखी आहेत...