आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक पाऊस:सप्टेंबरच्या पावसाने 45%पर्यंत घटले तेलबिया, मसाल्यांचे दर; दुष्काळाची शक्यता संपुष्टात आली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका महिन्यात सर्वाधिक सोयाबीनचे भाव पडले.

ऑगस्टपर्यंत देशाच्या अनेक राज्यांत दुष्काळाची स्थिती जाणवत होती. मात्र सप्टेंबरमध्ये देशाच्या अनेक भागांत झालेल्या पावसामुळे एक महिन्यात चित्र पूर्ण पालटून गेले. याचा थेट परिणाम तेलबिया आणि मसाल्याच्या किमतींवर झाला. गेल्या एक महिन्यात त्याच्या किमती ४५ टक्क्यांपर्यंत घटल्या आहेत. ऑगस्टमध्ये सोयाबीन १०,६८० रु. प्रतिक्विंटलच्या उच्च पातळीपर्यंत गेल्या होत्या. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत याने ५,९०१ रुपयांचा नीचांकी स्तर पाहिला.

या हिशेबाने यात जास्तीत जास्त ४४.७५% घसरण दिसली. क्रूड पाम तेल(सीपीओ) एका महिन्यात ९.७६% स्वस्त झाले आहे. याच पद्धतीने गेल्या एक महिन्यात हळद १८ टक्के, जिरा सुमारे १२ टक्के आणि धने १३ टक्क्यांपेक्षा जास्त स्वस्त झाले. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यापासून दुष्काळाची शक्यता असणाऱ्या भागांत चांगला पाऊस झाला.

महागाईतून मिळेल दिलासा
जुलैदरम्यान किरकोळमध्ये खाद्यतेलांची महागाई ३४ टक्के वाढली होती. आता तेलबियांचे भाव घटल्याने सणाआधी त्यांच्या किमती कमी होऊ शकतात. याची अनेक कारणेही आहेत. उदा. सरकारने सोयाबीनवर साठा मर्यादा लावली होती आणि खाद्यतेलाची आयात खुली केली आहे.

एका महिन्यात सर्वाधिक सोयाबीनचे भाव पडले.
कृषी उत्पन्न ऑगस्ट (हाय) सप्टेंबर (लो ) घसरण(%)
सोयाबीन 10,480 5,901 -44.75
ग्वारगम 11,424 8,841 -22.61
हळद 8,750 7,162 -8.74
जिरा 15,915 14,025 -18.15
धने 8,750 7,590 -11.88
रि. सोया 1,433 1,293 -4.76
सीपीओ 1,205 1,100 -9.76
गवार 6,794 5,851 -13.26

बातम्या आणखी आहेत...