आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Ola Company Cuts Staff I 500 Staff Will Be Cut In Software Department I Latest News And Update

ओला कंपनीत कर्मचारी कपात:सॉफ्टवेअर विभागातील 500 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; बॅटरी कार्यक्षमता, सेवेबाबत ग्राहकांच्या तक्रारी

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओला कंपनी त्यांच्या सॉफ्टवेअर वर्टिकलमध्ये किमान 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते. CNBC TV-18 वृत्तवाहिणीने सुत्रांच्या माध्यामातून हे वृत्त प्रकाशित केले आहे. सॉफ्टवेअर व्हर्टिकलमध्ये अनेक कर्मचारी ओला अ‌ॅपवर काम करत होते. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या घसरत्या विक्रीमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने फक्त 3,351 स्कूटर विक्री करू शकली.

कंपनी गेल्या काही महिन्यांपासून पुनर्रचनेचे काम करत आहे. ओला कार, ओला कार्स आणि क्विक कॉमर्स व्यवसाय ओला डॅश बंद झाल्यामुळे कंपनीने यापूर्वी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. भविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील संघातील सदस्यांसह 30 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात पद सोडले आहे.

नॉन-सॉफ्टवेअर अभियांत्रिकी डोमेनवर लक्ष केंद्रित करेल
ओला कंपन्यांच्या प्रवक्त्याने टाळेबंदीच्या संख्येवर भाष्य करण्यास नकार दिला. ओला भारतातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी, इलेक्ट्रिक वाहने, सेल, बॅटरी, उत्पादन आणि ऑटोमेशनमध्ये अभियांत्रिकी आणि R&D क्षमता निर्माण करून नॉन-सॉफ्टवेअर अभियांत्रिकी डोमेनवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

अभियांत्रिकी टॅलेंट पूल 5 हजार पर्यंत वाढण्याचे उदिष्ट्ये

कंपनीकडे सद्या सुमारे 2 हजार अभियांत्रिकी आहेत. पुढील 18 महिन्यांत त्यांचा अभियांत्रिकी टॅलेंट पूल 5 हजार पर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. या कारणांमुळे कंपनी पुनर्रचना करत आहे. मार्चमध्ये ओला एस 1 स्कूटरला आग लागली होती.

बॅटरीची कार्यक्षमता, सेवेबाबत ग्राहकांच्या तक्रारी

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या आठ घटनांसह या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. तपासणीत विविध इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांच्या बॅटरी पॅकमध्ये वापरल्या जाणार्‍या पेशींच्या गुणवत्तेत कमतरता आढळून आली. गेल्या नऊ महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत असलेल्या या कंपनीला सॉफ्टवेअर, बॅटरी कामगिरी आणि सेवेबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत.

ऑगस्टमध्ये केवळ 3,351 स्कूटर विक्री केल्या
कंपनीने एप्रिलमध्ये 12,691 स्कूटर विकल्या. ऑगस्टमध्ये कंपनीने केवळ 3,351 वाहनांची विक्री केली. जी सहा महिन्यांतील सर्वात कमी आहे. विक्रीतील घसरणीमुळे ओला इलेक्ट्रिकला त्यांच्या ऑनलाइन थेट विक्री धोरणात सुधारणा करण्यास प्रवृत्त केले आहे. कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी अलीकडेच ग्राहकांना स्कूटर ऑनलाइन खरेदी करायचे आहेत की रिटेल स्टोअरमधून याविषयी अभिप्राय मागवला आहे. कंपनी मार्चपर्यंत 200 अनुभव केंद्र सुरू करणार आहे. याशिवाय 20 केंद्रे आधीच अस्तित्वात आहेत.

स्टार्टअप्सने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून काढले
भारतीय स्टार्टअप्सने वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. वर्षअखेरीस ही संख्या 60 हजारांच्या पुढे जाऊ शकते. Ola, Blinkit, Byju's, Unacademy, Vedantu, Cars24, Mobile Premier League, Lido Learning, mFine, Trail, Furlanco आणि इतर अनेक कंपन्यांनी यावर्षी आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

बातम्या आणखी आहेत...