आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटो:ओला इलेक्ट्रिकने नेदरलँडची कंपनी विकत घेतली; भारतात दुचाकीची निर्मिती करणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सध्या सुमारे 700 कोटींची कंपनी आहे एटेर्गो, एका चार्जिंगमध्ये 240 किमी चालेल स्कूटर
  • बॅटरी चार्जिंग, स्वॅपिंग नेटवर्कही उभे करू इच्छिते ओला

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने नेदरलँड्सच्या अॅम्सटरडॅममधील एटेर्गो बीव्ही कंपनी खरेदी केली आहे. एटेर्गो इलेक्ट्रिक स्कूटर तयार करते. तसेच ओला इलेक्ट्रिकने देश आणि जगातील प्रीमियम इलेक्ट्रिक दुचाकी बाजारामध्ये काम सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. २०२१ मध्ये ओला इलेक्ट्रिकची जागतिक इलेक्ट्रिक दुचाकी भारतात सुरू करण्याची योजना आहे. या कराराची रक्कम किती आहे याबाबत घोषणा झालेली नाही. एटेर्गोचे मूल्य सुमारे ७०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

या खरेदीनंतर ओला इलेक्ट्रिकच्या इंजिनिअरिंग आणि डिझाइन क्षमतांना एटेर्गोच्या वाहन निर्मितीचा अनुभवाची साथ मिळेल. एटेर्गोने टेस्ला, जनरल मोटर्स, फेरारी, जग्वार आणि बीएमडब्ल्यू यांच्याबरोबर काम केले आहे. ओला इलेक्ट्रिकचे १० कोटींहून जास्त दुचाकी वाहने असणारा जागतिक बाजारात आणि २ कोटींहून जास्त दुचाकी वाहने असलेल्या भारतीय बाजारपेठेत क्लीन एनर्जी वाहने आणण्याचे उद्दिष्ट आहे.

एका चार्जिंगमध्ये २४० किमी चालेल एटेर्गाे स्कूटर

२०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या एटेर्गोने ऑल-इलेक्ट्रिक अ‍ॅप स्कूटर विकसित केले आहे. अ‍ॅप स्कूटर प्रथम २०१८ मध्ये सादर करण्यात आले होता. हे स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर २४० किमीपर्यंत जाऊ शकते.

बॅटरी चार्जिंग, स्वॅपिंग नेटवर्कही उभे करू इच्छिते ओला

ओला इलेक्ट्रिकला भारतात चार्जिंग आणि स्वॅपिंग नेटवर्कदेखील स्थापित करायचे आहे. कंपनी सध्या इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग सोल्युशन्ससाठी अनेक पथदर्शी प्रकल्प चालवते. दिल्लीत बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन स्थापित करून ईव्ही इकोसिस्टिम विकसित करण्यासाठी ओला इलेक्ट्रिक आधीपासूनच भारताच्या प्रमुख वीज वितरण कंपन्यांच्या सहकार्याने काम करत आहे. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि अध्यक्ष भविश अग्रवाल म्हणतात की, मोबॅलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक वाहने आहेत. जगभरातील कारच्या तुलनेत दरवर्षी दुप्पट दुचाकींची विक्री केली जाते.

बातम्या आणखी आहेत...