आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओला कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये भारतात 25,000 हून अधिक इलेक्ट्रीक स्कूटर्सची विक्री केल्याची माहिती ओला इलेक्ट्रीकने सोमवारी जाहीर केले. दरम्यान, बाजारपेठेतील 30 टक्के हिस्सा मिळवला आहे. त्यामुळे कंपनीचा आत्तापर्यंतचा हा विक्रम राहीला आहे. ओला कंपनीने आपला विकास दर कायम ठेवून त्याच यश मिळवले आहे.
ऑटोमोबाईलसाठी डिसेंबर ठरला कमी विक्रीचा
ऑटोमोबाईल विक्रीसाठी डिसेंबर महिना थोडा कमी विक्रीचा ठरला. तरी देखील ओला कंपनीने रेकॉर्ड विक्री केल्याचा दावा ओलाकडून करण्यात आला आहे. ओला S1 इलेक्ट्रीक स्कूटरला देशात मोठं यश मिळालं असल्याचं कंपनीनं एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे.
मिशन इलेक्ट्रिकसाठी आम्ही सज्ज- अग्रवाल
वाढलेले नेटवर्क आणि वाढत्या मागणीसह ओला इलेक्ट्रीक तेजीत वाढू लागले आहे. 2022 मध्ये ग्लोबल ईव्ही हब बनण्याच्या दिशेत भारताच्या प्रवासात महत्त्वाची बाब ठरत आहे, असे मत ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी व्यक्त केले. ओला सद्यस्थितीत भारतात सर्वात तेजीनं वाढणारी ईव्ही कंपनी आहे. मिशन इलेक्ट्रीकसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि देशात ईव्ही तयार करण्यात यशस्वी राहिलो आहोत. ओला आता सर्वात मोठी आणि तेजीनं वाढणारी कंपनी आहे. भारताची ईव्ही बाजारपेठ देशात ईव्हीसाठी पुझील वर्षी फ्लडगेट उघडण्याच्या तयारीत असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.