आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारची अटल पेन्शन योजना देशभरातील नागरिकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. या योजनेत सामील होणाऱ्यांची संख्या 4 कोटींच्या पुढे गेली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) नुसार, अटल पेन्शन योजनेअंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात (2021-22) 99 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 1 हजार ते 5 हजारापर्यंत पेन्शन मिळणार आहे. अशा परिस्थितीत या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धपकाळाला आर्थिक सुरक्षा देऊ शकता. त्यामुळे या योजनेबद्दल जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हीही गुंतवणूक करून पेन्शन सेवेचा लाभ भविष्यात घेऊ शकता.
अटल पेन्शन योजना काय आहे ?
18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती अटल पेन्शन योनजेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत सहभागी होण्यासाठी बचत बॅंक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
वयोमानानुसार ठरवले जाते योगदान
निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे. हे किती रक्कमेची कपात झाली आहे यावर अवलंबून असते. दरमहा 1 ते 5 हजार रूपये पेन्शन मिळविण्यासाठी ग्राहकाला दरमहा 42 ते 210 रूपये द्यावे लागतील. वयाच्या 18 व्या वर्षी योजना घेतल्यावर हे होणार आहे. त्याचवेळी जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला 291 रुपये ते 1,454 रुपये प्रती महिना योगदान द्यावे लागतील. ग्राहक जितका जास्त योगदान देईल. तितके निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळेल. याशिवाय तुम्ही कलम 80 C अंतर्गत 1.5 लाख रूपयापर्यंतचा कर लाभाचा दावा करू शकता.
सोयीनुसार भरू शकता कर्जाचा हप्ता
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक म्हणजेच 6 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. योगदान स्वयं-डेबिट केले जाईल. म्हणजे रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून वजा केली जाईल आणि तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल.
ऑनलाइन खाते उघडू शकता
बँकेत जाऊनही खाते उघडता येईल
तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता. तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि विनंती केलेल्या कागदपत्रांसह बँकेच्या शाखेत जमा करावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल. त्यानंतर तुमचे मासिक योगदान तुमच्या वयोमानुसार ठरवले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.