आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक शेअर बाजारात २०२३ च्या सुरुवातीलाच वाढ दिसली. सोमवारी सेन्सेक्स ३२७ अंकांच्या वाढीसह ६१,१६८ अंकांवर बंद झाला. निफ्टीत ९२ अंकांची वाढ होऊन तो १८,१९७ च्या स्तरावर बंद झाला. जागतिक स्तरावर मजबूत कल असल्याने यादरम्यान निर्देशांकात मोठी हिस्सेदारी असलेल्या रिलायन्स आणि आयसीआयसीआय बँकेत खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. ट्रेडिंगदरम्यान एक वेळ अशी होती की सेन्सेक्स ३८२ अंक चढून ६१,२२३ वर पोहोचला होता. त्याचप्रमाणे निफ्टीही ११० अंकांच्या वाढीसह १८,२१५ च्या स्तरावर पोहोचला होता. विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदारांनी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयच्या मजबूत आकडेवारीसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. चीनने स्थानिक मागणी वाढण्यासाठी निर्यात शुल्क वाढवले. हे भारतासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे मेटल शेअर्सच्या पुढाकारात खरेदी बघण्यास मिळाली. आता बाजाराच्या नजरा जागतिक मोर्चावर येणाऱ्या डेटावर असेल. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत मिनिट्स जारी होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.