आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • On The Radar Of Several Audit Firm Regulators, Including PwC, Who Resigned From Tarnished Companies; Inquiry Underway

कठाेर धाेरण:कलंकित कंपन्यांतून राजीनामा देणाऱ्या पीडब्ल्यूसीसह अनेक ऑडिट फर्म नियामका रडारवर; चौकशी सुरू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घोटाळेबाज लेखा परीक्षकांवर नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अॅथॉरिटीचा फास
  • भारतीय कंपन्यांत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वित्तीय गैरव्यवहाराची प्रकरणे समोर

नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी(एनएफआरए)ने गेल्या काही महिन्यांत लेखा परीक्षकांच्या अचानक राजीनामा देण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये प्राइज वॉटर हाऊस कूपर(पीडब्ल्यूसी)सह अनेक ऑडिट फर्म्स आहेत. एनएफआरए म्हणजे राष्ट्रीय वित्तीय माहिती प्राधिकरण, एक स्वतंत्र नियामक संस्था आहे. संस्था घोटाळा करणाऱ्या ऑडिटरवर फास आवळत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत भारतीय उद्योग जगतात मोठ्या प्रमाणात वित्तीय घोटाळे समोर आले. प्राइस वॉटर हाऊस चार्टर्ड अकाउंटंट्स पीडब्ल्यूसीचा हिस्सा आहे. त्यांनी १३ ऑगस्टला जीव्हीके पॉवर व इन्फ्रा मुंबई विमानतळाच्या संचालनासंबंधी ऑडिटमध्ये सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून राजीनामा दिला होता. राजीनामा अशा वेळी आला जेव्हा सीबीआय आणि ईडी दोन्ही केंद्रीय संस्था आधीपासूनच जीव्हीके पॉवरविरुद्ध चौकशी करत आहेत.

जाणकारांनुसार, त्यांच्या लेखा परीक्षकांनी कंपनीच्या जाहीर निकालांवर आक्षेप घेतला होता का? याबाबत नॅशनल अॅथॉरिटी पीडब्ल्यूसीची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. प्रकरणाची माहिती बाळगणाऱ्या सूत्रांनुसार, यासाठी एनएफआरए लवकरच नोटीस जारी करू शकते. दुसरीकडे, प्राइस वॉटर हाऊसकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

सत्यम घोटाळ्यासह अनेक प्रकरणांतही पीडब्ल्यूसीची चौकशी

सत्यम घोटाळ्यातील संशयित भूमिकेमुळे सेबीने २०१८ मध्ये प्राइस वॉटर हाऊसवर २ वर्षे बंदी घातली होती. मात्र, गेल्या वर्षी सॅट (सिक्युरिटीज अपिलिएट ट्रायब्यूनल) ने तो आदेश फिरवला होता. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स होम फायनान्सच्या ऑडिट प्रकरणात चौकशी होत आहे. पीडब्ल्यूसीने गेल्या वर्षी जुलैमध्ये ऑडिटिंग सोडले होते. याच पद्धतीने कोरोना महामारीच्या काही महिन्यांपूर्वी राजीनामा देणाऱ्या फर्मही रडारवर आहेत. नियमांनुसार, ऑडिट सोडण्याआधी फर्मला कारण सांगावे लागेल. लेखा परीक्षकांनी दावा केला की, ते बाजूला सरकत आहेत. कारण, ग्राहक जास्त शुल्क देण्यास असमर्थ आहेत.

बातम्या आणखी आहेत...