आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Once An Imitator Of Products, Samsung Is Now Number 1 In The World For Designing

ब्रँडच्या यशाची कहाणी:एकेकाळी उत्पादनांची नक्कल करत असे सॅमसंग, आज डिझायनिंगमुळे जगात नंबर 1

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅमसंग | इलेक्ट्रॉनिक्स कंपनी { स्थापना ः १९३८ { बाजारमूल्य ः २२ लाख कोटी रु.

मोबाइल आणि टीव्हीच्या व्यवसायात जगातील नंबर १ कंपनी असलेल्या सॅमसंगला फोर्ब्जने बेस्ट एम्प्लॉयरच्या यादीतही नंबर १ वर स्थान दिले आहे. म्हणजे ही कंपनी कामाच्या बाबतीत जगात सर्वोत्कृष्ट आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एकूण २,८७,४३९ कर्मचारी ७४ देशांत सॅमसंग नेटवर्कमध्ये काम करतात. सॅमसंगची ८४ वर्षांपूर्वीची कंपनी नंबर वन बनण्याची कहाणीही खूप रंजक आहे. सुरुवातीला ते नूडल्स बनवायचे, नंतर किराणा व्यवसायात उतरले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आले. नक्कल करून उत्पादने बनवणाऱ्या सॅमसंगने डिझाइनमध्ये सतत नावीन्य आणि बदल करून नंबर १ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबद्दल जाणून घेऊया.

छायाचित्र मार्च १९९५ चे आहे. तेव्हा कंपनीचे अध्यक्ष ली कुन सॅमसंगच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर समाधानी नव्हते, तेव्हा त्यांनी कंपनीच्या २,००० कर्मचाऱ्यांना दक्षिण कोरियाच्या कारखान्याबाहेर एकत्र केले आणि दीड लाख फोन आणि फॅक्स मशीन जमा करून त्याला आग लावली.

यावर्षी डिझायनिंगचे ७१ पुरस्कार ३० वर्षांपूर्वी सॅमसंगने इतर कंपन्यांसाठी फक्त परवडणाऱ्या उत्पादनांची नक्कल करून उपकरणे बनवली होती. इंजिनिअरिंगवर जास्त भर देणाऱ्या सॅमसंगने डिझायनिंगवर भर दिला नाही. पण, आता ते डिझायनिंगमध्येही अव्वल आहेत, त्यांना डिझाइनचे पॉवरहाऊस म्हटले जाते, यावर्षी कंपनीला डिझायनिंगशी संबंधित एकूण ७१ प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

इतिहास : खाद्यपदार्थ तसेच सेक्युरिटीचाही व्यवसाय १ मार्च १९३८ रोजी ली ब्युंग चुल यांनी दक्षिण कोरियात सॅमसंगची सुरुवात केली. त्या वेळी ही कंपनी सुकी मासळी, किराणा, नूडल्सचा व्यवसाय करत असे. ३० वर्षांनी कंपनीने विमा, रिटेल, सुरक्षा व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाऊल ठेवले. १९७० मध्ये पहिला कृष्णधवल पी-३२०२ दूरदर्शन संच लाँच केला. यानंतर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, व्हीसीआर व कॅमेरा यांसारखी अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवली. १९८६ मध्ये एससी-१०० हा पहिला अंगभूत कार फोन लाँच केला. १९९६ मध्ये सॅमसंगने नोएडामध्ये पहिला प्लांट उघडून टीव्हीचे उत्पादन सुरू केले. २००५ पासून याच प्लांटमध्ये मोबाइल फोन्स बनवायला सुरुवात झाली. भारतात विकल्या जाणाऱ्या मोबाइल फोनपैकी १९ टक्के वाटा सॅमसंगचा आहे.

व्यवसाय : सॅमसंग गॅलॅक्सी फोनमुळे जगात नंबर १ सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स चार क्षेत्रांत आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि मोबाइल कम्युनिकेशन, डिव्हाइस सोल्यूशन आणि रिसर्च-डेव्हलपमेंट सेंटर. तथापि, सॅमसंग ग्रुप रिअल इस्टेटमध्येदेखील व्यवहार करतो. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये व्हिज्युअल डिस्प्ले, एलसीडी, ओएलईडी डिस्प्ले, क्यूएलईडी टीव्ही इत्यादींचा व्यवसाय आहे. याशिवाय कंपनी आरोग्य उपकरणेही बनवते. आयटी-मोबाइल कम्युनिकेशनमध्ये मोबाइलव्यतिरिक्त ते त्याच्या नेटवर्कशी जोडलेल्या पायाभूत सुविधाही तयार करते. सॅमसंग १९९३ पासून डिव्हाइस सोल्यूशन्सअंतर्गत मेमरी कार्ड तयार करते. याशिवाय सेमीकंडक्टर, प्रोसेसरही बनवत आहेत. २०१० नंतर सॅमसंगने गॅलॅक्सी एस फोन लाँच केला तेव्हा केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात त्याला खूप मागणी होती.

संशोधन : संशोधनावरील खर्चात सातत्याने वाढ सॅमसंग हा कोरियन शब्द आहे आणि त्याचा अर्थ ३ तारे असा होतो. कोरियन संस्कृतीत ३ ही एक शक्तिशाली संख्या मानली जाते. सॅमसंगचे सर्वात मोठे ग्राहक अॅपल, बेस्ट बाय, डिट्युश टेलिकाॅम, व्हेरिझाॅन आणि तैवानची सुप्रीम इलेक्ट्रॉनिक्स कंपनी हे आहेत. हे कंपनीच्या एकूण विक्रीच्या १५ टक्के होते. सॅमसंग संशोधन आणि नवोपक्रमावर खर्च वाढवत आहे. गेल्या वर्षी आर. अँड डी. वर १३.७३ अब्ज डाॅलर खर्च केले. २०१६ मध्ये सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ स्मार्टफोनमध्ये स्फोटाची अनेक प्रकरणे समोर आली होती. तसेच फोन जास्त गरम होण्याची समस्या येत होती. कंपनीने फोन परत मागवले. पण समस्या दूर झाली नाही तेव्हा सॅमसंगने फोन कायमचा बंद केला. यामुळे २०१६ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला सुमारे १५,३७५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

सॅमसंगचे प्रिन्स : राष्ट्रपतींना लाच दिल्याचा आरोप, दोनदा तुरुंगवास सॅमसंग कंपनीची मालकी ली ब्युंग कुटुंबाकडे आहे, त्यांनी ती स्थापन केली. ली ब्युंग यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा ली किन ही अध्यक्ष झाला. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा ली जे-योंग सॅमसंगचा अध्यक्ष झाला. मात्र, २०१७ मध्ये त्यांच्यावर राष्ट्रपतींना दोनदा लाच दिल्याचा आरोप झाला होता. यानंतर सरकार आणि व्यापारी घराण्यांच्या संबंधाबाबत लोक रस्त्यावर उतरले. आता वादाच्या भोवऱ्यातील ली-जे-योंग यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...