आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात अस्थैर्याच्या वातावरणात बहुतांश भारतीय कंपन्या जानेवारी- मार्च तिमाहीत नवीन भरती करण्याच्या तयारीत आहेत. मॅनपॉवर ग्रुपच्या ताज्या एम्प्लॉयमेंट आउटलुक सर्व्हेत सहभागी ३००० कंपन्यांपैकी ४८% भारतीय कंपन्यांनी मार्च तिमाहीत आणखी जास्त लोकांना नोकरी देण्याचे म्हटले आहे. ३४% कंपन्या सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल करू इच्छित नाहीत, तर १६% ने हायरिंगच्या इच्छेत कमीची भीती वर्तवली आहे. या दृष्टीने भारताचा नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक ३२% राहिला, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत १७% कमी आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रातही सिंगापूर (३३%) नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हायरिंगबाबत देशाच्या चारही क्षेत्रांत सकारात्मक कल उत्तर भारतात मार्च तिमाहीत नव्या भरतीचा आउटलुक सर्वाधिक ३६% आहे. तो पश्चिम भारतात ३२% तर दक्षिण भारतात २९% तर पूर्व भारतात २६%. आयटी उद्योग, वित्त आणि रिअल इस्टेट क्षेत्राने भरतीबाबत सर्वाधिक आशावादी आउटलुक दाखवला आहे. कंझ्युमर गुड्स आणि सेवा क्षेत्राचा क्रमांक आहे.
गेल्या तिमाहीच्या तुलनेत ‘हायरिंग इंटेंट’ मजबूत मॅनपॉवर ग्रुपच्या अहवालात जगातील ४१ देशांच्या ३९००० पेक्षा जास्त कंपन्यांना सहभागी करून घेतले होते. यात १२ देशांमध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेत हायरिंग इंटेंट मजबूत झाला तर २९ देशांमध्ये हायरिंग इंटेंट घटले आहे. भारत जागतिक सरासरी २३%पेक्षा खूप जास्त ३२% सह मजबूत हायरिंग इंटेंट असलेल्या ५ देशांत आहे.
देशात अनेक देशांच्या तुलनेत चांगले हायरिंग आऊटलूक इतर देशांच्या तुलनेत भारतातील नोकऱ्यांचा दृष्टिकोन चांगला आहे. सणासुदीचा काळ चांगला जावो. जीडीपीबाबतही सकारात्मक भावना आहेत. मात्र, मार्च तिमाहीत आर्थिक वर्ष संपल्याने आणि जागतिक अनिश्चिततेमुळे कंपन्या वेट अँड वॉचच्या स्थितीत आहेत. -बालासुब्रमण्यम ए, उपाध्यक्ष, टीमलीज सर्व्हिसेस मजबूत हायरिंग इंटेंटच्या टॉप ५ देशांमध्ये भारत
देश नेट आउटलुक पनामा 39% कोस्टारिका 35% कॅनडा 34% सिंगापूर 33% भारत 32%
मार्च तिमाहीत १६% कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करू शकतात 16% कपात करू शकतात 34% कोणताच बदल नाही 02% काही सांगू शकत नाही 48% भरतीसाठी तयार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.