आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँडबाजा:50 पाहुण्यांच्या मर्यादेमुळे लग्नसराई उद्योगाला एक लाख कोटींचे नुकसान शक्य, 2.5 लाख कोटींचा वार्षिक व्यवसायच संकटात

जयपूर, नवी दिल्ली / प्रमोद शर्मा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहा कोटी मजुरांना रोजगारावर पाणी सोडावे लागू शकते

कोरोना महारोगराईचा अटकाव करण्यासाठी लग्न समारंभात केवळ ५० जणांना परवानगी दिल्यामुळे जवळपास २.५ लाख कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय करणाऱ्या विवाह कार्याशी संबंधित उद्योगावरील संकट गडद झाले आहे. या उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांनुसार, सरकारने लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येत ढील दिली नाही तर २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईदरम्यान कोट्यवधी मजूर आणि व्यावसायिकांच्या रोजगारावर पाणी सोडावे लागेल. याशिवाय जवळपास एक लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. ऑल इंडिया टेंट डेकोरेटर वेल्फेअर असोसिएशनचे सीनियर व्हाइस चेअरमन रवी जिंदल म्हणाले, लग्न समारंभ नसल्यामुळे आर्थिक स्थिती आणखी वाईट होऊ शकते. कारण, बाजारपेठेत पैसा येणार नाही. लग्नसराईतील उद्योगातून देशात मंडप, मॅरेज गार्डन, केटरिंग, डेकोरेशन आणि इव्हेंटसह जवळपास तीन कोटी व्यावसायिक जोडले आहेत.

या उद्योगातून दरवर्षी सुमारे १२-१३ कोटी लोकांना रोजगार मिळतो. हा देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास १० टक्के आहे. ऑल इंडिया टेंट डेकोरेटर वेल्फेअर असोसिएशननुसार, या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्चपासून जुलैदरम्यान लग्न समारंभ टाळणे किंवा मर्यादित झाल्याने लग्न उद्योगाला १५-२० हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. जिंदल म्हणाले, आम्ही १९ ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाची संसदीय समिती आणि केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांना निवेदन दिले आहे. आम्ही सरकारकडे लग्न समारंभात ३००-४०० लोकांना सहभागी होण्यात सूट देणे, वीज बिलांत स्थायी शुल्क हटवणे, मध्यम वर्गाच्या मंडप व्यावसायिकांना बिनव्याजी २५ लाख रुपयांचे कर्ज आणि मोठ्या व्यावसायिकांसाठी १ कोटीची बँक मर्यादा जारी करण्याची मागणी आहे. इकडे, सरकारने मदत मिळत नसल्याचे पाहून राजस्थान टेंट डीलर्स किराया व्यवसाय समिती या प्रकरणात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.

एकट्या राजस्थानात तीन लाख लोकांचा रोजगार जाऊ शकतो
मंडप व्यावसायिकांनुसार राजस्थानातील सुमारे ५५ हजार मंडप व्यावसायिक व ३ लाख कामगारांची उपजीविका संकटात आली आहे. राज्यात दर वर्षी जवळपास ५-६ लाख विवाह होतात. यामुळे या उद्योगात जवळपास १२,००० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. सरकारने त्वरित पावले न उचलल्यास तीन-चार हजार कोटींचे नुकसान होऊ शकते.

एवढी क्षेत्रे जोडलेली लग्नसराईशी
इव्हेंट, फूल, लाइट, जनरेटर, डीजे साऊंड, बँड, फोटोग्राफर, ऑर्केस्ट्रा, केटरिंग, स्वयंपाकी, विवाहस्थळ.
बाजार वाढण्यास उपयोगी ठरणाऱ्या बाबी
लग्नांतून कापड, सराफा, फूटवेअर, किराणासह अनेक उद्योग जोडले आहेत. लग्नसराईत ३ कोटी व्यापारी जोडले गेले आहेत.

लग्नसराईतील उद्योग
03 कोटी व्यापारी लग्नसराईत जोडले.
12 कोटींच्या जवळपास लोकांना रोजगार देते.
01 कोटीपेक्षा जास्त लग्न होतात वर्षभरात

बातम्या आणखी आहेत...