आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेकजण ऑनलाईन बँकिंग करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण असे व्यवहार करत असताना बँक अकाऊंटची काळजी घेणे गरजेचे असते. सध्या ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारात फसवणुकीचे प्रमाण वाढले असून हॅकर्स सहज लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत.
स्मार्टफोनचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. आपल्या काही चुकांमुळे आपले बँक खाते काही क्षणात रिकामे होते...चला तर जाणून घेऊया- ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार करताना कोणत्या चूका टाळाव्या, त्याचबरोबर खात्याची काळजी कशी घ्यायची, बंद पडलेले खाते कसे सुरू करावे, यासंदर्भात आरबीआयचे नियम काय सांगतात.... वाचा सविस्तर....
काय घ्याल दक्षता, वाचा पुढील काय पॉईंटद्वारे...
नेहमी OTP पर्याय निवडा
अनेकजण ऑनलाइन व्यवहार किंवा खरेदी करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ऑनलाइन व्यवहार करताना पासवर्ड टाकतात आणि त्यांचे खाते रिकामे होते. नेहमी व्यवहार करताना OTP पर्याय निवडा.
हॅकर्सची राहते तुमच्या बॅंकिंगवर माहिती
जर तुम्ही कोणत्याही वेबसाइट किंवा अॅपवरून ऑनलाइन खरेदी करता तेव्हा हॅकर्स तुमची बँकिंग माहिती जसे की डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, UPI आयडी इ. जतन करून ठेवतात.
कोणत्याही ठिकाणी नेट बॅंकिंग करू नका
अनेकजण त्यांच्या ऑफिस किंवा सायबर कॅफे इत्यादी कोणत्याही ठिकाणी त्यांचे नेट बँकिंग लॉग इन करतात. तसेच अनेकजण त्यांच्या ऑफिसच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरूनही खरेदी करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर आजच ही सवय टाळा नाहीतर तुमचे खाते रिकामे झालेच समजा.
आमिष देणाऱ्या कॉलला टाळा
फसवणूक करणारे लोक अनेकदा कर्ज, केवायसी किंवा कोणत्याही लॉटरीच्या नावाखाली कॉल करून आमिष देतात त्यांच्या जाळ्यात अनेकजण अडकतात. आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक होते.
काय सांगतात आरबीआयचे बॅंकिंग नियम
डिजिटल इंडियाच्या या युगात आता तुम्ही घरी बसून बँक खाते उघडू शकता. काही वेळा बँक काही ग्राहकांची खाती निष्क्रिय करते. यामागचे कारण जाणून घेऊया.
निष्क्रिय बँक खाते
अनेक वेळा बँक खाते उघडल्यानंतर लोक कोणतेही व्यवहार करत नाहीत. असे केल्याने त्यांचे बँक खाते निष्क्रिय होते. आज डिजिटल माध्यमातून बँक खाते उघडणे खूप सोपे झाले आहे. संपूर्ण प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन करता येते. पण ते सांभाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अशा प्रकारे खाते होते निष्क्रिय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, जर तुमच्या बचत किंवा चालू खात्यात दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल, तर ते खाते निष्क्रिय खात्यात टाकले जाते. निष्क्रिय खात्यावर गेल्यानंतर, तुमचे खाते निष्क्रिय होते.
याशिवाय, जर तुमचे खाते दहा वर्षे निष्क्रिय खात्यात राहिले आणि तुम्ही त्याच्याशी कोणताही व्यवहार केला नाही, तर तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे आणि त्याचे व्याज शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केले जाते. असे काहीही करण्यापूर्वी बँक आपल्या ग्राहकांना माहिती देत असते.
या गोष्टीकडे द्या लक्ष
तुमचे बँक खाते असेल जे तुम्ही फारसे वापरत नसाल तर ते बंद करा. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असल्यास, त्यांची देखभाल करताना विशेष लक्ष द्या. तुमचे खाते निष्क्रिय खात्यात गेले असल्यास, ताबडतोब तुमच्या होम शाखेशी संपर्क साधा. तुम्ही ते खाते पुन्हा सक्रिय करण्यात रेडी व्हाल.
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या बँक खाते उघडू शकता
जर तुम्हाला घरी बसून बँक खाते उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला अकाऊंट ऑप्शनमध्ये 'Apply Now' आणि नंतर 'Open An Account Instantly' असे पर्याय दिसतील. त्यावर माहिती भरून तुम्ही खाते उघडू शकता. पण अशावेळी काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
युटिलीटी संदर्भातील अन्य बातम्या वाचा
लाभदायी:काय आहे 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना'; कशी करणार गुंतवणूक, किती मिळेल व्याज, वाचा सविस्तर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना देऊ केली होती. काल 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, जाणून घेऊया, ही योजना काय आहे, यात महिलांनी खाते कसे उघडायचे, कशी गुंतवणूक करायची, - यासह सर्वकाही समजून घ्या...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.