आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Online E Filing Tax Only A Handful Of Returns From A Month, Dozens Of Problems Have Not Been Resolved Yet

सिस्टिममध्ये त्रुटी:एक महिन्यापासून जमा मोजकेच रिटर्न, डझनभर अडचणींचे निरसन अद्याप नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर महिनाभरानंतरही होत नाही काम

एका महिन्यापूर्वी सुरू केलेले नवीन प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल करदाते आणि कर प्रॅक्टिशनर्ससाठी डोकेदुखी ठरले आहे. या पोर्टलवर रिटर्न फाइल करू शकतो. यामध्येही टीडीएसच्या हजारो रिटर्न फाइल झाल्यानंतर फेटाळले आहेत. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी २२ जून रोजी पोर्टल तयार करणारी कंपनी इन्फाेसिसला सर्व अडचणी दूर करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी दिला होता, तो अवधी संपून आठवडा झाला आहे. वेबसाइट बनवण्यासाठी केंद्राने ४२४१ कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. ७ जून रोजी ते लाँच केले आहे. त्या दिवसापासून त्यात अनेक समस्या आहेत. यातील एक डझनहून अधिक समस्या अद्याप येतच आहेत. गेल्या एका महिन्यापासून देशात प्राप्तिकर रिटर्न आणि टीडीएस रिटर्न फाइल होत नाहीत. पोर्टलवर अद्यापही प्राप्तिकर रिटर्नचे सातपैकी ४ फॉर्म नाहीत. सीए कीर्ती जोशी म्हणाले, नव्या वेबसाइटवर रिटर्न फाइल होत नाहीत, यासोबत सर्व टीडीएस व टीसीएसचे रिटर्न ३ जुलैच्या आधी फाइल केले होते. तेही फेटाळण्यात आले आहेत. त्यांना पुन्हा फाइल करावे लागेल. रिटर्न रखडल्याने सर्वात जास्त समस्या ज्यांनी कर्जासाठी अर्ज केला आहे, त्यांना होत आहे. रिटर्न फाइल न झाल्यामुळे बँक त्यांची फाइल पुढे करत नाही.

सर्वकाही ऑनलाइनमुळे काम ठप्प
सीए अभय शर्मा यांनी सांगितले की, प्राप्तिकर विभाग पूर्णपणे ऑनलाइन मोडमध्ये काम करत आहे. रिटर्न फाइल करायचे असेल वा विभागाच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल किंवा अपील फाइल करायचे असेल सर्व काम ऑनलाइन होत आहे. ही सर्व कामे प्राप्तिकर वेबसाइटद्वारे होतात, मात्र ती बंद आहे.

या अडचणी अद्यापही कायम...
} चालान नंबर प्रमाणित होत नाही } डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर(डीन) ऑटो पॉपुलेट होऊ शकत नाही. } नव्या वेबसाइटवर फाइल केलेले नव्या टीडीएस रिटर्न रिजेक्ट होत आहेत. } फॉर्म १५ सीए/सीबी फाइल होत नाही. } वादातून विश्वास योजनेचा टॅब काम करत नाही. } रिटर्न फाइल होत नाही. } रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट फाइल होत नाही. } प्राप्तिकराच्या १४३(१)च्या इंटिमेशन ऑर्डर खुली होत नाही.
} आयटीआर फॉर्म ३,५,६,७ उपलब्ध नाही.

जुने पोर्टल बंद करून नवीन पोर्टल लाँच करणे मोठी चूक
जुने पोर्टल बंद करून नवे पोर्टल लाँच करणे मोठी चूक आहे. नवीन पोर्टल योग्य पद्धतीने काम करेपर्यंत दोन्ही पोर्टल सोबत सुरू राहिले पाहिजे होते. शक्य असेल तर जुने पोर्टल नव्याने सुरू झाले पाहिजे. - सुधीर हालाखंडी, चार्टर्ड अकाउंटंट

बातम्या आणखी आहेत...