आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Business
 • Online Gaming Revenue Increased By 22%; By 2024, The New World Will Have A Rapid Turnover Of Up To Rs 25,000 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात ऑनलाइन गेमिंगची क्रेझ:ऑनलाइन गेमिंगच्या महसुलात 22% झाली वाढ ; 2024 पर्यंत या नव्या विश्वात 25 हजार कोटींपर्यंतची होणार वेगात उलाढाल

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • एक गेमर महिन्याकाठी 250 ते 400 मिनिटांचा वेळ घालवतो, महसूल कमाईमध्ये अमेरिका जगात अव्वल

काेराेनाच्या धाेक्यामुळे देशामध्ये सध्या ऑनलाइन गेमिंगला पहिली पसंती दिली जात आहे. यातूनच या विश्वानेही आता झपाट्याने प्रगती साधली. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार आता देशात जवळपास ३० काेटी ऑनलाइन गेमर आहेत. आता आगामी दाेन वर्षांमध्ये याच जवळपास १४ काेटींची नव्याने भर पडणार आहे. त्यामुळे हा आकडा ४४ काेटीपर्यंत जाईल. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून महसुलामध्ये २२% वेगाने वाढ झाली. आता मिळत असलेल्या तुफान लाेकप्रियतेमुळे येत्या दाेन वर्षात हा महसूल जवळपास २५ हजार काेटींच्या घरात जाण्याचा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे नव्याने या गेमिंगचे स्वरूप देशभरात वेगाने विस्तारले जात आहे.

 • 30 काेटी ऑनलाइन गेमर देशात.२०२२ पर्यंत ४४ काेटी होणार
 • 60% पेक्षा अधिक ऑनलाइन गेमर २४ वर्षाखालील देशामध्ये आहेत.
 • 55 मिनिटांच्या सरासरीने एक ऑनलाइन गेमर राेज टाइम स्पेंड करतो.
 • 800 एमबी डेटा एक गेमर राेज गेम खेळताना खर्च करत असल्याची नोंद.

जगातील सर्वाधिक भागीदारी आशिया-पॅसिफिकची

जगातील गेमिंग मार्केटने २०१९ मध्ये ११.२५ लाख काेटींचा महसूल मिळवला हाेता. यामध्ये आशिया व पॅसिफिकमधून सर्वाधिक ५.३४ लाख काेटींची कमाई केली.

 • क्षेत्र : आशिया-पॅसिफिक - कमाई 5.34 लाख
 • क्षेत्र : लॅटिन अमेरिका - कमाई 41,350 काेटी
 • क्षेत्र : नाॅर्थ अमेरिका - कमाई: 2.92 लाख
 • क्षेत्र : युरोप, मिडल ईस्ट, आफ्रिका - कमाई: 2.56 लाख
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser