आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाउनच्या काळात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन लर्निंगची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशात अनेक विद्यार्थी रिमोट लर्निंगसाठी ग्रेडअप, वेदांतू, सिंप्लीलर्न, अपग्रेड, अनअकॅडमी आणि मसाई अशा ऑनलाइन माध्यमांना पसंती देत आहेत. या कंपन्यांना ऑनलाइन शिकवण्या घेण्यासाठी शिक्षकांची आणि व्यवस्थापकांची गरज आहे. यासंदर्भात सिंप्लीलर्नचे सीईओ आणि संस्थापक कृष्ण कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, लॉकडाउन ऑनलाइन लर्निंग क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरले आहे. कारण, याच काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्या घेणाऱ्यांची मागणी अचानक वाढली आहे.
एजुटेक कंपन्यांमध्ये 1 लाखपेक्षा अधिक नोकऱ्या
मॅनपावरग्रुपच्या अंदाजानुसार, भारतात एजुटेक कंपन्यांमध्ये जून पर्यंत जवळपास 12 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. 90 हजार नोकऱ्या गिग रोल (तात्पुरत्या) करारासाठी आहेत. सिंप्लीलर्नमध्ये सध्या 100 पेक्षा अधिक स्थायी जागा रिकाम्या आहेत. तर तात्पुरत्या नोकऱ्यांसाठी 500 हून अधिक जागा उपलब्ध आहेत. कृष्ण कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, सिंप्लीलर्न मध्ये आम्ही मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये शिकवणाऱ्या लोकांची मागणी 30 टक्क्यांनी वाढली आहे. नोकऱ्या देणे हा आमच्या कामाचाच एक भाग आहे. सध्याच्या परिस्थितीत वाढती मागणी पाहता आम्हाला जास्तीत जास्त लोकांची गरज आहे. या सर्वांना बोनस आणि मानधन त्यांच्या क्षमतेनुसार दिले जातात.
मसाई स्कूल 20 लोकांना देणार नोकऱ्या
मसाई स्कूल जूनच्या शेवटपर्यंत जवळपास 20 जणांना नोकऱ्या देण्याच्या तयारीत आहे. यामध्ये चीफ ट्रेनर, क्युरीकुलम चीफ, मार्केटिंग मॅनेजर, एंट्री काउंसलर आणि सब्जेक्ट स्पेशलिस्ट इत्यादी पदांचा समावेश आहे. मसाई स्कूलचे सीईओ आणि सह-संस्थापक प्रतीक शुक्ला म्हणाले, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या टीमचे सुद्धा मूल्यांकन केले जात आहे.
ऑनलाइन शिकवणाऱ्यांची मागणी वाढली
व्हाइटहट ज्युनिअरमध्ये दरमहा ऑनलाइन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढत आहे. त्यांना शिकण्यासाठी आम्हाला जास्तीत-जास्त कर्मचाऱ्यांची गरज आहे. व्हाइटहट ज्युनिअरचे सीईओ करण बजाज यांच्या मते, या कंपनीत दर महिन्याला जवळपास 1,500 शिक्षक आणि 400 इतर कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. अनअकॅडमी सुद्धा एका वर्षात 500 हून अधिक शिक्षक भरती करण्याची योजना बनवत आहे. अनअकॅडमीचे व्हाइस प्रेसिडेंट, एचआर टीना बालचंद्रन म्हणाल्या, आम्ही सेल्स आणि ऑपरेशन अशा कामांसाठी लोकांना भरती करणार आहोत.
वेदांतूमध्ये 1500 कर्मचाऱ्यांची गरजऑनलाइन लर्निंगच्या वाढत्या मागणीला देत आहेत. वेदांतूचे सीईओ आणि सह-संस्थापक, वामसी कृष्णाने यांच्या मते, "ऑनलाइन लर्निंगची मागणी वाढत असल्याने आम्हाला बॅकएंड आणि टेकमध्ये कामांना गती देत आहोत. आम्ही सर्वच लेबलवर 1500 कर्मचारी भरती करणार आहोत. त्यामध्ये टेक्नोलॉजी, प्रॉडक्ट, फायनांस, स्ट्रॅटेजी आणि इतर विभागांचा समावेश आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या 18-20 मिनिटे लाइव्ह क्लासच्या कमाईमध्ये 80 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, ग्रेडअपच्या ऑनलाइन विद्यार्थी आणि नवीन मेंबर्समध्ये 25 टक्के वाढ झाली आहे.
लॉकडाउनमध्ये गरज वाढली
ग्रेडअपचे सीईओ आणि संस्थापक शोभित भटनागर म्हणाले, की कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्रात आमची मागणी वाढली आहे. आमच्या ऑनलाइन क्लासेसची मागणी ऑफलाइनच्या तुलनेत कित्येक पटीने वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला टीम वाढवावी लागली. येत्या त्रेमासिकात आम्ही टेक्नोलॉजी, प्रॉडक्ट आणि सेल्सच्या प्रोफेशनल्सवर काम करणार आहोत. मे महिन्यापासून या पदांवर 30 ते 40 माणसं ठेवत आहोत. अपग्रेडच्या सीनिअर स्टाफचा भाग असलेले सीईओ अर्जुन मोहन आणि व्हाइस प्रेसिडेंट पुनीत तंवर म्हणाले, आम्ही प्रॉडक्ट आणि बिझनेस साइडसह काही वरिष्ठ पदांवरल भरती करत आहोत. ते येत्या 4 ते 6 आठवड्यात आमच्या कंपनीत रुजू होत आहेत. आम्ही भरतीची प्रक्रिया सुद्धा ऑनलाइन केली आहे. व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांची भरती करत आहोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.