आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी जगभरात लैंगिक समता स्काेअर ६८.१% होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार, हे प्रमाण बरोबरीत जाण्यास १३२ वर्षे लागतील. आयटी कंपन्यांचा समावेश देशातील अग्रणी महिला नियोक्त्यांमध्ये असला तरी भारतात आयटी उद्योगही याला अपवाद नाही. कॉर्पोरेट्सच्या संचालक मंडळात विविधता अणि समावेश (डी अँड आय) नवी समस्या नाही. तरीही देशातील प्रमुख आयटी कंपन्यांचा वार्षिक अहवाल, महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांमधील मोठ्या फरकाचा संकेत देतात. विशेषत: वरिष्ठ पदांबाबत हा फरक जास्त आहे. टीसीएसचा दावा आहे की, त्यांच्याकडे जगातील सर्वाधिक महिला कर्मचारी आहेत. मात्र, या कंपनीतही सुमारे २.१० लाखांपेक्षा जास्त महिला कर्मचारी जगभरातील त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या अवघ्या ३५ टक्केच आहेत. कंपनीत वरिष्ठ पदांवर महिलांचे प्रमाण यापेक्षाही कमी आहे. मार्च २०२२ पर्यंतच्या स्थितीनुसार, कंपनीत ३१.१% मध्यम पातळीवरील अधिकारी महिला आहेत. वरिष्ठ पातळीवर यापेक्षाही कमी फक्त १३.३% महिला आहेत. टीएसीएसने त्यांच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात मिड सीनियर पातळीवर महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.
देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये मार्च २०२२ पर्यंत ३९.६% महिला कर्मचारी होत्या. कंपनीच्या संचालक मंडळात २५% सदस्य महिला आहेत. तिकडे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे जगभरात जेवढे कर्मचारी आहेत, त्यात फक्त २८% महिला आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.