आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis:केवळ 5% शेअर्स सर्वकालीन उच्चांकावर!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘उभरता ज्वार सभी नावों को ऊपर उठा लेता है’ अशी एक म्हण आहे. पण शेअर बाजारातील अलीकडच्या विक्रमी रॅलीसाठी ती लागू पडत नाही. या महिन्याच्या सुरुवातीला सेन्सेक्सने प्रथमच ६३ हजारांची पातळी ओलांडली असून, ६३,५८३ ची नवीन उंची गाठली. तथापि, किरकोळ गुंतवणूकदारांना याचा फारसा फायदा झाला नाही. कारण केवळ ५% शेअर्स उच्चांकी पातळीवर आहे. बीएसई आणि एनएसईच्या आकडेवारीनुसार, नुकत्याच झालेल्या रॅलीमध्ये केवळ ६३ शेअर्सचा सर्वाधिक वाटा आहे. यामध्ये १४ लार्जकॅप, ९ मिडकॅप आणि ४० स्मॉलकॅप शेअर्सचा समावेश आहे. लार्जकॅप शेअर्समध्ये एल अँड टी, अॅक्सिस बॅँक, एसबीआय, अदानी एंटरप्राइजेस, कमिन्स, ब्रिटानिया, एस्कॉर्ट‌्स कुबाटा आणि हल यांचा समावेश आहे. तो लाइफटाइम हायच्या जवळ ट्रेडिंग करत आहे. या वर्षीच्या जूनच्या मध्यापासून ही सर्वात तेजी रॅली दर्शवते. म्हणूनच नुकत्याच झालेल्या रॅलीमध्ये तुमच्या पोर्टफोलिओच्या शेअर्समध्येही वाढ होणे आवश्यक नाही.

आताच्या तुलनेत ऑक्टोबर २०२१ मध्ये परिस्थिती चांगली बीएसई आणि एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सेन्सेक्सने ६२,२४५ चा लाइफटाइम उच्चांक गाठला होता. त्यानंतर १८% शेअर उच्च पातळीवर व्यवहार करत होते. या वेळी अशा शेअर्सची संख्या निम्म्याहून कमी आहे.

लार्जकॅप शेअर्सची स्थिती काहीशी चांगली १४% लार्ज-कॅप शेअर शिखर पातळीच्या जवळ आहेत. ४३% शिखर पातळीपेक्षा ५-२०% मागे आहेत व एक तृतीयांश २०-५०% मागे आहेत. ९% लार्ज-कॅप स्टॉक जसे की झोमॅटो, डीएलएफ आणि इंडस टॉवर शेअर उच्चांकावरून ५०% पेक्षा जास्त खाली ट्रेड करत आहेत. इंडियन ऑइल, ओएनजीसी, कोल इंडिया, बीपीसीएलसारखे सरकारी स्टॉक आतापर्यंतच्या उच्चांकावरून ३०-५५% मागे आहेत.

आता यासाठी फक्त निवडक स्टॉक्स वाढताहेत स्वतंत्र बाजार विश्लेषक प्रकाश दिवाण म्हणाले की, काही महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात परतले आहेत. ते एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) द्वारे मोठ्या प्रमाणावर बाजारात पैसे गुंतवतात. अशा फंडांमध्ये निवडक स्टॉक्स असतात. पण हळूहळू तेजीची व्याप्ती वाढेल.

स्मॉल, मिडकॅप शेअर्स रॅलीत मागे स्मॉल कॅप श्रेणीतील केवळ ४% आणि मिडकॅप श्रेणीतील६% शेअर त्यांच्या उच्चांकाजवळ व्यवहार करत आहेत. स्मॉलकॅपचे दोन तृतीयांश आणि अर्ध्याहून अधिक मिडकॅप शेअर त्यांच्या उच्चांकावरून २०-७५% खाली आहेत. या वर्षी जूनच्या मध्यापर्यंत चाललेल्या सुधारणांमध्ये अनेक छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण झाली.

२७३ शेअर उच्चांकावरून ५-२०% मागे

लाइफटाइम लार्ज मिड स्मॉल उच्चांकापासून मागे कॅप कॅप कॅप 5-20% 43 52 178 20-50% 34 62 380 50-75% 7 20 218 75% पेक्षा जास्त 2 7 100 (स्रोत: कॅपिटालाइन) स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मजबूत तेजीचा कल सुरू होण्यास वेळ लागेल.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार फ्लॅट बंद मुंबई| सलग दुसऱ्या दिवशी चढ-उतारानंतर सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार सपाट बंद झाले. सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून ६२,८३४ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ३६१ अंकांनी घसरून ६२,५०५ वर आला. दुसरीकडे, निफ्टी केवळ ५ अंकांनी वर चढला आणि १८,७०१ वर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...