आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Opposition Riots In Parliament Over Adani; Demand For Constitution Of Parliamentary Committee

संसदेत हादरे:अदानींवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ;   संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंडेनबर्गच्या अहवालावरुन केंद्र सरकारला विरोधकांनी घेरले

अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे शेअर बाजाराला बसलेले हादरे गुरुवारी संसदेतही जाणवले. विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, सपा, जदयू, शिवसेना उद्धव गट, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. गदारोळात संसद दिवसभर तहकूब करण्यात आली.

दरम्यान, अदानी समूहाचे भागभांडवल ८.३८ लाख कोटींनी घटले आहे. अदानी समूहाने बुधवारी रात्री २० हजार कोटींचा एफपीओ रद्द केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व आपचे नेते संजयसिंह यांनी संसदेच्या नियम २६७ अन्वये राज्यसभेत याप्रकरणी नोटीस दिली होती. यात हिंडेनबर्ग अहवाल आणि अदानी समूहाबाबत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, सभापती जगदीप धनखड यांनी नोटीस रद्द करून ही मागणी फेटाळली. संसदेबाहेर बोलताना खरगे म्हणाले, एलआयसी, एसबीआय आणि सार्वजनिक संस्थांमध्ये असलेला गरीबांचा पैसा ठरावीक कंपन्यांना दिला जातो. कोट्यवधी लोकांची ही कमाई धोक्यात आहे.

संसद तहकूब : लोकसभा-राज्यसभेत विरोधकांनी कामकाज रोखले
बँकांच्या कर्ज, गुंतवणुकीबाबत रिझर्व्ह बँकेने मागवली माहिती
रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांकडून अदानी समूहातील गुंतवणूक व दिलेल्या कर्जाची माहिती मागवली आहे. ब्लूमबर्गनुसार स्टेट बँकेने अदानी समूहाला २१,२६८ कोटी, बँक ऑफ बडोदाने ७ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. एलआयसीचे ३६,४७४ कोटींचे कर्ज किंवा गुंतवणूक आहे. इकडे,आमची गंुतवणूक सुरक्षित असल्याचा दावा बँकांनी केला आहे.

गौतम अदानी यांचा व्हिडिओ जारी; म्हणाले, कंपनीचा पाया भक्कम
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘एफपीओ मागे घेतल्याने आश्चर्य वाटले असेल, परंतु बाजारातील चढ-उतार पाहता ते पुढे मार्गी लावणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असे आम्हाला वाटले. कंपनीचा पाया,बॅलन्सशीट मजबूत आहे. कर्जही वेळेवर चुकते केले आहेत.

६ सत्रांत समूहाच्या बाजार भांडवलात १०० अब्ज डॉलर घट
शेअर बाजारातील घसरणीमुळे अदानी समूहाचे बाजार भांडवल ८ लाख ३८ हजार कोटींनी घटले. फोर्ब्स रियलटाइम यादीत अदानींची १७ व्या स्थानी घसरण झाली आहे.

समभाग गुरुवारी ६ सत्र बाजार भांडवल
अदानी एंटर. -26% -55% -2.14
अदानी टोटल -10% -56% -2.39
अदानी ग्रीन -10% -46% -1.39
अदानी ट्रान्स. -10% -44% -1.34
अदानी पोर्ट‌्स -6% -39% -0.65
अदानी पाॅवर -5% -26% -0.28
अदानी विल्मर -5% -26% -0.20
एकूण घसरण -- 47.2% -8.38
बाजार भांडवल लाख कोटी रुपयांमध्ये

बातम्या आणखी आहेत...