आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Orders For 12 Crore Meters Of Clothing Arrived Within Two Months Of The School Opening; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:शाळा उघडताच दोन महिन्यांत आल्या 12 कोटी मीटर कपड्याच्या आर्डर; २ वर्षांच्या बंदनंतर भिलवाड्यातील कापड गिरण्या पुन्हा गतिमान

भिलवाडा13 दिवसांपूर्वीलेखक: जसराज ओझा
  • कॉपी लिंक
  • गणवेशाच्या कापडाची परदेशात निर्यात

काेराेना महामारीमुळे जवळपास गेल्या दाेन वर्षांपासून देशातील बहुतांश राज्यांत शाळा-महाविद्यालये बंद असल्याने मंदीच्या झळा साेसणाऱ्या भिलवाड्यातील कपडा उद्याेगाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस अाले अाहेत. गेल्या दाेन महिन्यांत भिलवाडा वस्त्र उद्याेगांना १२ काेटी मीटरपेक्षा जास्त गणवेशाच्या कपड्याच्या अाॅर्डर मिळाल्या अाहेत. १२ राज्यांमध्ये शाळा अाणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यामुळे ही तेजी परतली अाहे.

राजस्थानमधील भिलवाडा उत्तर भारतातील गणवेश कपड्याचा सर्वात माेठा उत्पादक अाहे. येथे दरवर्षी जवळपास ३० काेटी मीटर शालेय गणवेषाच्या कपड्याचे उत्पादन हाेते. गेल्या वर्षी, शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच आलेल्या कोविड संसर्गामुळे संपूर्ण वर्ष कोरडे गेले. या वर्षाच्या सुरुवातीलाही शाळा आणि महाविद्यालये उघडण्याबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे बाजार थंड राहिला. परंतु सप्टेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने जुलैच्या अखेरीपासून कापड गिरण्यांना नवीन ऑर्डर येऊ लागल्या.

जुलैच्या अखेरपासून ते अातापर्यंत १२ काेटी मीटर कापडाच्या ऑर्डर आल्या आहेत. अाता देशात जवळपास १२ राज्यांतील मोठ्या वर्गाच्या शाळा आणि महाविद्यालये उघडल्यामुळे ४० % अाॅर्डर अाल्या अाहेत. लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यावर अाणखी तेजी येईल असा विश्वास आदर्श सिंथेटिक्स या टेक्सटाइल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गाेपाळ झंवर यांनी व्यक्त केला.

गणवेशाच्या कापडाची परदेशात निर्यात
शालेय गणवेशाचे कापड भिलवाड्यापासून आफ्रिकन आणि अरब देशांमध्ये जाते. बांगलादेश, व्हिएतनाम, श्रीलंका या रेडिमेड कपडे उत्पादकही शाळेच्या गणवेशाचा कपडा येथून खरेदी करतात. या देशांतूनही ऑर्डर येत आहेत.

  • 40 - टक्के ऑर्डर मिळाल्या गेल्या दोन महिन्यांत
  • 30 - कोटी मीटर गणवेशाचा कपडा तयार होतो दरवर्षी
  • 300 - युनिट्समध्ये गणवेशाचा कपडा बनतो भिलवाड्यात

1. शाळा-कॉलेज उघडणे वस्त्रोद्योगासाठी शूभभ संकेतआहे. दोन हजार कोटींचा व्यवसाय फक्त शालेय ड्रेसचा आहे, जो दोन वर्षांपासून बंद होता. पुन्हा अाॅर्डर मिळत आहेत. भिलवाड्यात १०० पेक्षा जास्त युनिट्स मध्ये हे उत्पादन होते. - अतुल शर्मा, कार्यकारी अध्यक्ष, भिलवाडा कापड व्यापार महासंघ

बातम्या आणखी आहेत...