आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Out Of 100 IPOs In 2007, 77 Per Cent Returns Are Now Negative; News And Live Updates

अॅनालिसिस:2007 मधील 100 आयपीओंपैकी 77 टक्क्यांचे रिटर्न आता नकारात्मक; आयपीओबाबत सुरू अंध स्पर्धेत इशारा देणारा डेटा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॉप गेनर्समध्ये पेज इंडस्ट्रीज अव्वल, दिला 100 पट रिटर्न

आयपीओ गंुतवणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये सुरू असलेल्या अंध स्पर्धेदरम्यान गुंतवणूकदारांना याच्या धोक्याबाबत सावध करणारा डेटा समोर आला आहे. त्यानुसार, २००७ मध्ये लिस्ट झालेल्या आयपीओमध्ये केवळ २३% च आतापर्यंत सकारात्मक रिटर्न देण्यात यशस्वी राहिले, तर ७७% चा रिटर्न नकारात्मक राहिला आहे. प्राइम डेटा बेसच्या एका विश्लेषणात ही माहिती समोर आली आहे. बाजारात नवनवीन आयपीओ येत आहेत. २०२१ च्या पहिल्या आठ महिन्यांत आतापर्यंत एकूण ४०,००० कोटी रुपयांचे २७ आयपीओ बाजारात आले आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांचे आयपीओ रांगेत आहेत. या वातावरणात गुंतवणूकदार, विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. यामुळे अायपीओचा विक्रमी भरणा पाहायला मिळत आहे.

आयपीओत गुंतवणुकीआधी फंडामेंटल तपासा
कंपन्या आपला आयपीओ अनुकूल वेळेत आणतात. मात्र, त्यांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी अनुकूल असावा हे गरजेचे नाही. आयपीओसाठी अर्ज करण्याआधी कंपनीचे फंडामेंटल अवश्य तपासले पाहिजे. -एस. रंगनाथन, हेड ऑफ रिसर्च, एलकेपी सिक्युरिटीज

टॉप गेनर्समध्ये पेज इंडस्ट्रीज अव्वल, दिला १०० पट रिटर्न
२००७ च्या आयपीओत सीएनएक्स-५०० इंडेक्सने रिटर्नवर मात देणाऱ्या ११ कंपन्यांमध्ये पेज इंडस्ट्रीज अव्वल राहिली. आयपीओवेळी याच्या शेअरची ऑफर किंमत ३६० रु. होती. ही १०० पट वाढून ३२,७६० रु. झाली. चांगले रिटर्न देण्याच्या बाबतीत माइंडट्री आणि कावेरी सीड्सचे नाव येते. त्यांनी अनुक्रमे ३० पट आणि २० पटीपेक्षा जास्त रिटर्न दिला.

2007 प्रायमरी मार्केट

  • 100 आयपीओलिस्ट झाले
  • 2007 मध्ये16 निगेटिव्ह रिटर्न देणारे
  • 17 स्टॉक एएसएमच्या कक्षेत आले
  • 31 स्टॉक निलंबित वा डीलिस्ट झाले

आयडिया, डीएलएफच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे भांडवल संपवले
आयडिया सेल्युलर आणि डीएलएफ दोन प्रमुख नावे आहेत. त्यांचे शेअर २००७ मध्ये सूचिबद्ध झाले आणि काळानुरूप त्यांच्या गुंतवणूकदारांचे भांडवल नष्ट झाले. २००७ मध्ये लिस्ट जवळपास १० वस्त्रोद्योग कंपन्यांच्या प्रकरणातही असेच झाले. पेज इंडस्ट्रीज वगळता या क्षेत्रातील बहुतांश अन्य कंपन्यांनी शेअरधारकांना नफ्याऐवजी तोटा दिला. २००८ च्या सुरुवातीस लिस्ट झालेली कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांची संपत्ती खूप कमी केली.

बातम्या आणखी आहेत...