आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा:4.5 लाख कोरोना मेडिक्लेमपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात, मिझोराममध्ये फक्त एकच दावा

अजय कुलकर्णी | औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात वाहन विमा क्षेत्रात 13 टक्क्यांची घसरण

कोरोनाच्या संसर्गानंतर आतापर्यंत आरोग्य विमा क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत १५.८ टक्के वाढ झाली आहे. देशात २१ ऑक्टोबरपर्यंत कोरोनाबाधित ४.४५ लाख लोकांनी कोविडच्या उपचारासाठी आरोग्य विमा पॉलिसीचा आधार घेतला आणि त्यासाठी दावे (क्लेम) दाखल केले. त्यापैकी ३.०२ लाख दाव्यांचा निपटारा झाला आहे. विविध कंपन्यांनी दाव्यांचा परतावा म्हणून पॉलिसीधारकांना आतापर्यंत २,९१४ कोटी रुपयांची रक्कम अदा केली आहे. सर्वाधिक १.७७ लाख मेडिक्लेम महाराष्ट्रातून झाले आहेत, तर मिझोराममधून सर्वात कमी एक दावा दाखल आहे.

जनरल इन्श्युरन्स कौन्सिलनुसार, कोविडमुळे सर्वसाधारण विमा क्षेत्रात सर्वाधिक १५.८% वाढ आरोग्य क्षेत्रात नोंदवली गेली. तर, वाहन व मरीन (सागरी उद्योग) क्षेत्रात नकारात्मक वाढ आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत वाहन विमा क्षेत्रात उणे १३.३ %, तर मरीन क्षेत्रात उणे १३.६ % नकारात्मक वाढ दिसली.

बातम्या आणखी आहेत...