आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षी जुलैमध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्रात आठ महिन्यांतील सर्वाधिक वृद्धी पाहायला मिळाली. नव्या ऑर्डर आणि आउटपुटमध्ये जोरदार वाढ हे याचे प्रमुख कारण मानले जात आहे. एसअँडपी ग्लोबलच्या एका सर्व्हेनुसार, मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स जुलै महिन्यात जूनच्या तुलनेत ५३.९ वरून ५६.४ झाला आहे. सर्व्हेनुसार, जुलैमध्ये चार महिन्यांत विदेशी मागणीबाबत सर्वात कमकुवत वेगाने विस्तार झाला आणि कंपन्यांनी तीन महिन्यांत सर्वात मंद गतीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. तर इनपुट खर्च इन्फ्लेशनचा दरही जुलैमध्ये ११ महिन्यांच्या सर्वात नीचांकी पातळीवर आला आहे. यामुळे उत्पादनांच्या किमतीतील वृद्धी दरात चार महिन्यांत घट झाली आहे. आरबीआयने मेच्या सुरुवातीला आपल्या प्रमुख व्याजदरांत एकत्रित ९० आधार अंकांनी वाढ केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.