आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅपच्या माध्यमातून ग्राहकांना हॉटेल सुविधांची माहिती देणारी कंपनी OYO कर्मचारी कपात करणार आहे. तशाप्रकारची घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे. कंपनीने सांगितले की, काही प्रकल्प कंपनी बंद करू इच्छित असल्याने त्यांना कर्मचारी कपात करावी लागणार आहे.
जागतिक मंदीचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने अनेक टेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात आहे. तर काही कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचे संकेत दिले जात आहे. अमेझॉन, गुगल सह अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी यंदा नवीन भरती होणार नसल्याचे जाहीर केलेले आहेत. त्यात आता आणखी नवीन भर पडली असून ओयो (OYO) एकूण कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
10 टक्के कर्मचारी काढणार
OYO 10% कर्मचार्यांची संख्या कमी करणार आहे. टेकमधून 600 कर्मचाऱ्यांना काम सोडावे लागणार आहे. OYO कंपनीने सांगितले की, हे पाऊल त्यांच्या संघटनात्मक संरचनेत व्यापक बदलांची अंमलबजावणी करण्याचा एक भाग आहे. हे त्याचे उत्पादन आणि अभियांत्रिकी, कॉर्पोरेट मुख्यालय आणि OYO व्हेकेशन होम्स संघांचे आकार कमी करत आहे. ते भागीदार संबंध व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास संघांमध्ये लोकांना जोडत आहे. OYO आपल्या 3,700-कर्मचारी बेसपैकी 10 टक्के कमी करेल, ज्यामध्ये 250 सदस्यांची नवीन नियुक्ती आणि 600 कर्मचाऱ्यांना सोडून देणे समाविष्ट आहे, असे एका निंवेदनात म्हटले आहे. कामात सुरळीतपणा यावा म्हणून अभियांत्रिकी संघांचे विलीनीकरण केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
सहामाही निकाल कसे राहीले
ओयो कंपनीने नुकतेच गेल्या सहामाही निकाल जाहीर केला आहे. सहा महिन्यात कंपनीला 63 कोटी रुपयेचा कर-पूर्व फायदा झालेला आहे. दुसरीकडे गेल्या एका वर्षात ओयो कंपनीने नुकसान देखील सहन केले आहे. एप्रिल- सप्टेंबर 2022 च्या सहामाहीत महसूलात 24 टक्के वाढ होऊन कंपनी 2,905 कोटींवर पोहोचली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.