आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • P Chidambaram On 20 Lakh Crore Economic Package, Says PM Modi Gave Us Only Headline And Blank Page

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिदंबरम यांचा टोला:पंतप्रधानांनी आपल्याला केवळ हेडलाईन आणि कोरा कागद दिला, आता अर्थमंत्री ते कसा भरतात हे पाहायचंय!

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली, त्यावरच चिदंबरम यांची प्रतिक्रिया समोर आली

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या 20 लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांची फिरकी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आणि लॉकडाउनमुळे डबघाईला गेलेल्या अर्थव्यवस्थेसाठी मंगळवारी या पॅकेजची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना चिदंबरम म्हणाले, "पंतप्रधानांनी आपल्याला हेडलाईन आणि एक ब्लँक पेज दिले आहे. आता अर्थमंत्री त्या कोऱ्या कागदावर काय भरतात हे पाहायचे आहे. अर्थव्यवस्थेत टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमची नजर आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन दरम्यान 54 दिवसांत पाचव्यांदा देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी स्वावलंबनाचा धडा दिला. स्वावलंबी भारताच्या अभियनासाठीच 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज त्यांनी घोषित केले आहे. त्याचाच तपशील आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण 4 दिवसांत देणार आहेत. याचा पहिला टप्पा त्या आज संध्याकाळी 4 वाजता समवाजून सांगणार आहेत. सोबतच, 17 मे नंतरही लॉकडाउन राहणार आहे. परंतु, लॉकडाउनचा हा चौथा टप्पा कसा राहील हे 18 मे पूर्वी जाहीर केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...