आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाम तेल आयात:91.7 लाख टन पाम तेल आयातीचा अंदाज; 4 वर्षांत सर्वात जास्त

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२ वर्षे घटल्यानंतर हंगामात खाद्य तेलाची मागणी वाढली. २०२२-२३ मध्ये देशातील पाम तेलाची आयात १५% वाढून ९१.७ लाख टनपर्यंत पोहोचु शकते. चार वर्षातील ही विक्रमी आयात असेल. ‘इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन’च्या या अंदाजात सोयाबीन तेलाची आयात कमी होईल, असेही सांगण्यात आले आहे. व्यापार विश्लेष्कांच्या मते, नोव्हेंबरमध्ये सुरू हंगामाच्या सीझनच्या आधी ४ महिन्यात पाम तेलाची आयात ७४% वाढून ३६.७ लाख टन झाली. असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर देसाईने सांगितले, ‘या खाद्य तेलाचा वापर ५% वाढू शकतो.’ आयातीवरील निर्बंध हटवणे आणि किंमती कमी करणे हे त्याचे कारण असेल.

बातम्या आणखी आहेत...