आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च वरून 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने ( CBDT) प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आधार-पॅन लिंकिंगची अंतिम मुदत यापूर्वी अनेकदा वाढवली गेली आहे.
सर्वप्रथम, त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 होती. त्यानंतर लिंकिंग प्रक्रिया विनामूल्य होती. 1 एप्रिल 2022 पासून 500 रुपये शुल्क आकारण्यात आले आणि 1 जुलै 2022 पासून शुल्क 1,000 रुपये करण्यात आले. गतवर्षी जुलै महिन्यात संसदेत सादर केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एकूण 61,73,113 (6.17 कोटी) वैयक्तिक पॅनपैकी 46,70,66,691 (4.67 कोटी) पॅन-आधार लिंक्ड होते.
... तर 10 हजारांपर्यंत आकारला जाऊ शकतो दंड
पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास, अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खाते उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय हे पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
या पॅनकार्डधारकांना मिळाला दिलासा
आयकर कायदा 1961 अंतर्गत, काही लोकांना आधारशी पॅन लिंक करण्यापासून सूट देण्यात आली आहे. या गटात आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयातील लोक, अनिवासी, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
हे ही वाचा सविस्तर
पॅन-आधार लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
प्राप्तिकर विभागाने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 केली आहे. आजच पॅनला आधारशी लिंक करा. अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद पडेल. यासह अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
1 एप्रिलपासून होणार 'हे' बदल:6 अंकी हॉलमार्क सोन्याची खरेदी, जाणून घ्या- 11 बदल
एप्रिल महिना अनेक नवीन बदलांसह दार ठोठावत आहे. शेअर बाजार, गुंतवणूक, आयकर यासह तुमच्या इतर खर्चाशी संबंधित अनेक नियमात बदल होणार आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
शेवटची नामी संधी : PPF आणि सुकन्या खात्यात किमान रक्कम टाका, वाचा- 7 कामे कोणती करायची पूर्ण
आता आर्थिक वर्ष 2022-23 संपायला फक्त 3 दिवस उरले आहेत. या 3 दिवसांमध्ये, तुम्हाला PAN आधारशी लिंक करणे आणि कन्या खात्यात किमान रक्कम जमा करणे. यासह 7 महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. हे काम न केल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आम्ही तुम्हाला या 7 कामांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा भविष्यात होणारा त्रास टळू शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.