आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक वर्ष 2022-23 चा शेवटचा महिना म्हणजेच मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे आधार-पॅन लिंक करणे. तुम्ही हे 31 मार्च 2023 पर्यंत न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्कासह 31 मार्चनंतर आधारशी पॅन लिंक करावे लागेल.
1. आधार-पॅन लिंक
तुम्ही अजून तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. तुम्ही हे 31 मार्च 2023 पर्यंत न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये विलंब शुल्क आकारत आहे.
2. कर बचत गुंतवणूक
2022-23 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अद्याप कर गुंतवणूक केली नसेल. तर ती लवकरच करा. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षांची FD आणि ELSS इत्यादींमध्ये गुंतवणूक करून कलम 80C कर सूट मिळवू शकता. यासाठी 31 मार्चपर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.
3. पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक
जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करू शकतात. ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मार्चपर्यंतच यात गुंतवणूक करू शकता. ही 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.
4. SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची नवीन मुदत ठेव योजना अमृत कलश या महिन्यात संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर इतरांना 7.1% व्याज दिले जात आहे. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
5. मुच्युअल फंडात नामांकन
जर तुम्ही म्युच्युअल फंडात नॉमिनेशनची प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने 31 मार्चची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.