आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • PAN Card Will Become Inactive After March 31, 2023 I Know Complete Process Click Here I Latest News And Update 

पॅनला आधार कार्डशी त्वरित लिंक करा:अन्यथा 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड होईल इनअ‌ॅक्टिव, लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर सावधान व्हा. लवकरात लवकर ते लिंक करून घ्या, तुम्ही जर तसे केले नाही तर 31 मार्च 2023 नंतर तुमचे पॅन कार्ड असक्रिय होईल. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा संपली आहे. यावेळी आयकर विभाग ती तारीख वाढवण्याच्या तयारी मुळीच नाही. याच कारणामुळे सतत पॅन कार्ड धारकांना त्यांचे पॅन आधारशी लिकं करण्यास सांगत आहेत.

30 जून 2022 नंतर 1000 रुपये शुल्क
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये विलंब शुल्क आकारत आहे. प्राप्तिकर विभागाने सांगितले की, प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी, जे सवलत श्रेणीमध्ये येत नाहीत. 31 मार्च 2023 पूर्वीची आधार-पॅन कार्ड जोडण्याची शेवटची तारीख सांगितली गेली आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन आपोआपच निष्क्रिय होणार आहे.

10 हजार रुपयांपर्यंत भरावा लागेल दंड
पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा स्टॉक खाती उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय हे पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास या अडचणी येतील

 • 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करता येत नाही.
 • बँकांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त ठेवी आणि काढता येणार नाहीत.
 • पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास, कर विवरणपत्र भरले जाणार नाही.
 • कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात अडचणी येतील.
 • म्युच्युअल फंड किंवा आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही.
 • सरकारी योजनांचा लाभ घेतानाही अडचणी येतील.

आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया घ्या जाणून

 • सर्वप्रथम आयकर वेबसाइटवर जा.
 • त्या ठिकाणी क्विक लिंकमधील आधार लिंकवर क्लिक करा.
 • पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
 • पेमेंटसाठी NSDL वेबसाइटला भेट देण्याची लिंक दिसेल.
 • CHALLAN NO./ITNS 280 मध्ये, Proceed वर क्लिक करा.
 • लागू कर (0021) आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) निवडा.
 • पेमेंट प्रकारात (500) इतर पावत्या निवडाव्या लागतील.
 • पेमेंट मोड, नेट बँकिंग आणि डेबिट कार्ड असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
 • तुमच्या सोयीनुसार तुम्ही दोनपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
 • परमनंट अकाउंट नंबरमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर टाका.
 • मूल्यांकन वर्षात 2023-2024 निवडा.
 • पत्ता फील्डमध्ये तुमचा कोणताही पत्ता प्रविष्ट करा.
 • आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा.
 • Proceed वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमची प्रविष्ट केलेली माहिती स्क्रीनवर दिसेल.
 • माहिती तपासल्यानंतर I Agree वर खूण करा, Submit to Bank वर क्लिक करा.
 • तुम्ही प्रविष्ट केलेल्या तपशिलांमध्ये काही विसंगती आढळली तर पुन्हा एडिट करा.
 • आता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड पर्याय निवडून त्याठिकाणी 1000 रुपये भरा.
 • व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल.
 • डाउनलोड झालेली फाईल तुमच्याकडे सेव्ह ठेवा.
 • हे पेमेंट अपडेट होण्यासाठी 4-5 दिवस लागतील.

पेमेंट केल्यानंतरची प्रक्रिया घ्या जाणून

 • 4-5 दिवसांनंतर, तुम्हाला आधार कार्डच्या सहाय्याने आयकर वेबसाईडवरिल लिंकवर पुन्हा क्लिक करावे लागेल.
 • पॅन नंबर आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
 • जर तुमचे पेमेंट अपडेट केले गेले असेल तर स्क्रीनवर continue चा पर्याय दिसेल.
 • Continue वर क्लिक करा आणि आधार कार्डानुसार नाव आणि मोबाईल नंबर टाका.
 • I Agree वर टिक करून पुढे जा. आता तुम्हाला एक OTP मिळेल.
 • OTP टाका आणि validate वर क्लिक करा. आता एक पॉप अप विंडो उघडेल.
 • तुमची आधार पॅन लिंकिंगची विनंती प्रमाणीकरणासाठी UIDAI कडे पाठवण्यात आली आहे. असे पॉपअपमध्ये लिहिले जाईल.
 • व्हेरिफिकेशन नंतर तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल. तुम्ही आयकर वेबसाइडवर त्याची स्थिती तपासू शकता.
बातम्या आणखी आहेत...