आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Twitter Ex Ceo Parag Agarwal & Other Ex twitter Execs File Lawsuit; Twitter | Elon Musk

खटला:ट्विटरमधून काढून टाकलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी घेतली कोर्टात धाव, माजी CEOसह अन्य दोघांनी दाखल केला खटला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) नेड सेगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे यांची कंपनीतून मस्क यांनी हकालपट्टी केली होती. या तीनही कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सोमवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर कंपनीविरूद्ध न्यायालयात खटला दाखल केला. याद्वारे, कंपनीने कंपनीतून काढून टाकल्यानंतर खटले, चौकशी आणि पूर्वीच्या नोकऱ्यांशी संबंधित चौकशीच्या खर्चाची परतफेड करण्याची मागणी केली आहे.

1 डॉलर दशलक्षपेक्षा जास्त नुकसानीची मागणी
पराग अग्रवाल, नेड सेगल आणि विजया गड्डे यांनी या खटल्याद्वारे दावा केला आहे की, कंपनीने त्यांना 1 डॉलर दशलक्ष (सुमारे 82 लाख रुपये) पेक्षा जास्त देणे बाकी आहे. हे पैसे ट्विटरला द्यावे लागतील कारण हे पैसे देण्यासाठी ट्विटर कायदेशीररित्या बांधील आहे.

तपास यंत्रणांना सहकार्य करणे
वृत्तसंस्थेनुसार, कोर्टाने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डीओजे) यांच्या तपासाशी संबंधित विविध खर्चाचा तपशील दाखल केला आहे. मात्र, ही चौकशी आणि तपास अद्याप सुरू आहे की पूर्ण झाला आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, पराग अग्रवाल आणि तत्कालीन सीएफओ नेड सेगल यांनी गेल्या वर्षी यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनमध्ये साक्ष दिली आणि फेडरल अधिकाऱ्यांशी संबंध ठेवत आहेत.

ट्विटर डीलची चौकशी करत आहे SEC
यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने ट्विटर शेअर्स खरेदी करताना एलन मस्क यांनी सिक्युरिटी नियमांचे पालन केले की नाही. याची चौकशी व तपासणी करित आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये पराग अग्रवाल बनले होते CEO
जॅक डोर्सी यांनी 29 नोव्हेंबर 2021 रोजी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पराग अग्रवाल यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले होते. सीईओ होण्यापूर्वी पराग हे ट्विटरचे चीफ आयटी ऑफिसर्स अधिकारी होते. 2021 मध्ये त्यांना पगार आणि इतर भत्ते म्हणून $3.04 दशलक्ष मिळाले. सीईओ म्हणून अग्रवाल यांचा पगार 1 डॉलर मिलियन म्हणजेच वार्षिक 9 कोटी 24 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.