आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Paytm IPO| Share Market| Mumbai| Cold Response To Registration Of One97 Communications For Big IPO, Disappointment Of Investors Due To Paytm, Loss Of Rs 641

पेटीएमला निराशा:मोठा आयपीओ आणणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्सच्या नोंदणीला थंड प्रतिसाद, पेटीएममुळे गुंतवणूकदारांची निराशा, 641 रुपयांचा तोटा

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ग्राहकांना कॅश बॅक देणाऱ्या पेटीएम या फिनटेक कंपनीने गुरुवारी आपल्या गुंतवणूकदारांकडूनच कॅश बॅक वसूल केला. पेटीएमची संचालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सच्या समभाग गुरुवारी २,१५० या इश्यू किमतीच्या तुलनेत घसरून १,५६४.१५ रुपयांवर बंद झाला.

त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून समभाग खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति समभाग ६४१ रुपयांचा माेठा ताेटा सहन करावा लागला. देशातील या सर्वात माेठ्या आयपीओची गुरुवारी नाेंदणी १,९५५ रुपये म्हणजे ९ %च्या सवलतीत झाली. त्यानंतर त्यात सातत्याने घसरण हाेत गेली आणि दिवसअखेर बाजार बंद हाेताना या समभागांत २७.२५ टक्क्यांची घसरण हाेऊन १,५६४.१५ रुपयांवर बंद झाला. पेटीएममधील घसरण कायम राहणार असल्याचा अंदाज मॅक्वेरीने व्यक्त केला आहे.या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मने पेटीएमसाठी १,२०० रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.

तीन कारणांमुळे नाेंदणीत नरमाई

1. आयपीओ आकार माेठा व मागणी कमी हाेती. त्यामुळे जवळपास सर्वच गुंतवणूकदारासांठी प्राथमिक बाजारपेठेतच समभाग वितरित झाले. सहाजिकच दुय्यम बाजारपेठेसाठी ग्राहकच उरले नाहीत.
2. कंपनीच्या व्यवसाय मॉडेलबद्दल शंका आहेत. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढले. पेटीएमला सर्वाधिक फायदा झाला, पण कंपनीला फायदा होऊ शकला नाही.
3. फाेनपे आणि गुगल पे व्यतिरिक्त, या बाजारात सरकारी भीम अॅप देखील आहे. पेटीएमसाठी रस्ता अवघड आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?

किरकोळ गुंतवणूकदारांनी तोटा सहन करून पेटीएममधून बाहेर पडणे चांगले होईल. या समभागात सुधारणा हाेणे अवघड आहे. त्यासाठी वर्षे लागू शकतात.

काेणत्याही कंपन्यांचे मूल्यांकन अचूक नसते : शर्मा
समभागाची घसरण ही आमच्या कंपनीच्या मूल्याचे सूचक नाही. कंपनीच्या समभागाची किंमत अचूक नसते किवा तिचे मूल्यांकनही अचूक नसते. आपण सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. आपले खरे मूल्य दिसण्यासाठी काही तिमाही, वर्षे किंवा अगदी दशके लागू शकतात. - विजयशेखर शर्मा, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पेटीएम विजय शर्मा

बातम्या आणखी आहेत...