आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Paytm Is Bringing The Facility Of Getting Cash Directly From Foreign, Cash Will Come In Digital Wallet As Soon As It Is Transferred; News And Live Updates

परदेशातून पैसे मिळवणे झाले सोपे:​​​​​​​पेटीएम देत आहे परदेशातून थेट निधी हस्तांतरणाची सुविधा, परदेशातून डिजिटल वॉलेटमध्ये येणार पैसे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाते प्रमाणीकरण व्यतिरिक्त नावाचा देखील उल्लेख असणार

पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेनुसार, परदेशात राहणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांकडून रोख रक्कम मिळवणे आता सोपे होणार आहे. पेटीएम ही सेवा सुरु करत असून याव्दारे आपण थेट आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये परदेशातून पैसे मिळवू शकणार आहोत. पेटीएम पेमेंट्स बँकेने यासाठी 'रिया मनी ट्रान्सफर' सोबत करार केला आहे. या निर्णयामुळे, पेटीएम पेमेंट्स बँकेचे 33.3 कोटी ग्राहक याचा लाभ घेऊ शकणार आहे.

अॅप किंवा वेबसाइटद्वारे रोख हस्तांतरणाची सुविधा
रिया मनी ट्रान्सफर युरोनेट वर्ल्डवाइडचा हा व्यवसाय विभाग आहे. ही कंपनी एका देशातून दुसऱ्या देशात निधी हस्तांतरित करण्याची परवानगी देते. याचे नेटवर्क जगभरात 3.6 अब्ज पेक्षा जास्त बँक खाती, 41 कोटी मोबाईल आणि व्हर्च्युअल खात्यांसाठी सेवा देत आहे. जगभरात याचे 4,90,000 रिटेल आउटलेट आहेत. परंतु, त्याचे ग्राहक अॅप किंवा वेबसाइटद्वारे रोख हस्तांतरित करू शकतात.

खाते प्रमाणीकरण व्यतिरिक्त नावाचा देखील उल्लेख असणार
रिया रिअल टाइम आधारावर तिची सेवा देते. म्हणजेच एका पक्षाचा निधी हस्तांतरित करताना दुसऱ्या पक्षाला पैसे मिळतात. त्याच्या निधी हस्तांतरणात अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, पेमेंट करण्यापूर्वी खाते प्रमाणीकरण व्यतिरिक्त नावाचा देखील उल्लेख असणार आहे. खात्याच्या प्रमाणीकरणात व्यवहार करण्यापूर्वी बँक खाते क्रमांक आणि इतर तपशील जुळवले जातात.

निधी हस्तांतरण सुरक्षित, आर्थिक आणि जलद असेल
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या नवीन सेवेबद्दल बोलताना त्याचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सतीश कुमार गुप्ता म्हणाले की, आम्ही पेटीएम वॉलेटला थेट आंतरराष्ट्रीय हस्तांतरण (परदेशातून रोख रक्कम) करण्याची सुविधा प्रदान करत आहोत. निधी हस्तांतरण पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने आणि जलद होईल. ज्यांचे पूर्ण KYC (Know Your Customer) झालेले असेल त्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...